अमरावती विभागात उद्दिष्टाच्या २७७ पटीने तूती लागवडीची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:25 PM2019-07-24T12:25:24+5:302019-07-24T12:27:10+5:30

यंदाच्या खरीप हंगामाकरिता रेशीम संचालनालयाने अमरावती विभागात तुती लागवडीचे ९५० एकरांचे उद्दिष्ट दिले होते. आतापर्यंत तब्बल २५०० शेतकऱ्यांनी लागवडीकरिता नोंदणी केली आहे.

Registration of mulberry cultivation in Amravati | अमरावती विभागात उद्दिष्टाच्या २७७ पटीने तूती लागवडीची नोंदणी

अमरावती विभागात उद्दिष्टाच्या २७७ पटीने तूती लागवडीची नोंदणी

Next
ठळक मुद्देरेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कलगतवर्षी ३७५ मेट्रिक टन कोशनिर्मिती

श्यामकांत सहस्त्रभोजने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामाकरिता रेशीम संचालनालयाने अमरावती विभागात तुती लागवडीचे ९५० एकरांचे उद्दिष्ट दिले होते. आतापर्यंत तब्बल २५०० शेतकऱ्यांनी लागवडीकरिता नोंदणी केली आहे. रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, गतवर्षी ३७५ मेट्रिक टन कोशनिर्मिती अमरावती विभागातून झाली होती.
रेशीम उद्योग कमी भांडवलामध्ये भरपूर नफ्याचा उद्योग आहे. सन २०१३ मध्ये अमरावती विभागात ३१० शेतकऱ्यांनी ४३१ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली होती. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून १ लाख ३५ हजार अंडीपुंज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. त्यावर्षी ७१ मेट्रिक टन कोशनिर्मिती झाली होती. गतवर्षी २०१८-१९ मध्ये २७८९ शेतकऱ्यांनी ३१९३ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून ५ लाख ७४ हजार अंडीपुंज शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. त्याच्या माध्यमातून सुमारे ३७५ मेट्रिक टन कोशनिर्मिती झाली. हैदराबाद, बंगळुरू येथील बाजारपेठेत त्याची विक्री झाली आहे.

अकोला-बडनेरा रोडवरील प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून रेशीम उत्पादन व तुती लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यामुळे यंदा उद्दिष्टापेक्षा मागणीत २७७ पटींनी वाढ नोंदविण्यात आली. तथापि, यंदाचे पाऊसमान पाहूनच लागवड करण्याचा निर्णय शेतकरी घेतील. यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांनी लागवड व उत्पादनाचा उच्चांक गाठला आहे.
- महेंद्र ढवळे, सहायक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय

Web Title: Registration of mulberry cultivation in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती