परीविक्षाधीन ३० आरएफओंची नियमित पदस्थापन; महसूल व वनविभागाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 07:27 PM2020-10-15T19:27:24+5:302020-10-15T19:27:40+5:30
हिमाचल प्रदेशाचे सुंदनगर, उत्तरखंडातील हळदवाणी व कुंडल येथे प्रशिक्षण
अमरावती : राज्याच्या वनविभागात परीविक्षाधीन सरळ सेवेच्या ३० वनपरिक्षेत्र अधिकाºयांना (आरएफओ) नियमित पदस्थापना मिळाली आहे. या सर्व आरएफओंनी हिमाचल प्रदेशाचे सुंदनगर, उत्तरखंडातील हळदवाणी व कुंडल येथे प्रशिक्षण घेतले आहे. आरएफओंना क्षेत्रीय प्रशिक्षणाच्या कार्यक्रमानुसार रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात आली.
यात सागर हराळ (औरंगाबाद), कुंडलिक होरे, सुशांत पाटील (अमरावती), सचिन कटरे (नागपूर), अनिल शेलार (अमरावती), रुपेश खेडकर (नागपूर), नेहा मुरकुटे (अमरावती), कांचन भुसाळ (अमरावती), प्रवीण राऊत (अमरावती), अपेक्षा शेंडे (नागपूर), रणजित जाधव (अमरावती), कुणाल लिमकर (अमरावती), सुजमत निर्मळ (नागपूर), अक्षमकुमार करमळकर (अमरावती), विशाल झांबरे (अमरावती), ललिता पाटील (नागपूर), स्वप्निल चुंबले (औरंगाबाद), उज्ज्वला कमदुम (नागपूर), कोमल गजरे (नागपूर), गायत्री सोनवणे (नागपूर), रूपाली शिंदे (नागपूर), आशा ससाणे (नागपूर), सारिका घेवडे (अमरावती), शुभांगी मोहिते (नागपूर), रूपेश गावित (नागपूर), नरेश चौके (नागपूर), शिल्पा शिगवान (नागपूर), रोहित बोरकर (अमरावती), आशिष वासनिक (अमरावती), मीनाक्षी पवार (नागपूर) यांचा समावेश आहे. सदर आरएफओंची पदस्थापना दीड वर्षासाठी करण्यात आली आहे. परीविक्षाधीन कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण न केल्यास किंवा विभागीय परीक्षा योग्य नसल्याचे आढळून आल्यास ती सेवा समाप्त करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे. शासनाने नमूद केलेल्या हिंदी व मराठीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल, असे महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी अ. का. लक्कस यांनी आदेशात नमूद केले आहे.