११ जलकुंभ निर्मितीनंतरच नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:08 PM2018-05-05T22:08:31+5:302018-05-05T22:08:31+5:30

अंबानगरीत जीवन प्राधिकरणच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अस्तित्वातील १५ पाण्याच्या टाकीवरून अंबानगरीला पाणीपुरवठा होत असला तरी उच्च दाबाने नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत.

Regular water supply only after the construction of the Jalakumbh | ११ जलकुंभ निर्मितीनंतरच नियमित पाणीपुरवठा

११ जलकुंभ निर्मितीनंतरच नियमित पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देशहरात तोवर एक दिवसआड पाणी : मजीप्राच्या मुख्य अभियंत्यांची माहिती

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानगरीत जीवन प्राधिकरणच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अस्तित्वातील १५ पाण्याच्या टाकीवरून अंबानगरीला पाणीपुरवठा होत असला तरी उच्च दाबाने नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आणखी ११ नवीन टाक्या बांधल्यास नेहमीत पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुरेश चारथळ यांनी सांगितले.
अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्ष शहराला पुरेल एवढा पाणीसाठा (७० टक्के) धरणात सध्या शिल्लक आहे. परंतु तरी पूर्वी नियमित मिळणारे पाणी आता एकदिवसआड मिळत आहे. यासंदर्भात मुख्य अभियंत्यांशी चर्चा केली असता शहराची लोकसंख्या साडेआठ लाख असली तरी मजीप्राच्यावतीने अधिकृत कनेकशन ९० हजार देण्यात आले आहेत. मात्र यानंतर शहराचा नवीन विस्तार झाला असून, जुने काही कनेकशन नवीन पाईपलाईनवर जोडण्यात येणार आहे.
शहराला रोज ९५ द.ल.ली प्रति रोज पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ११ नवीन टाक्या बांधणे गरजेचे असल्याचे मत चारथळ यांनी व्यक्त केले. शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेंतर्गत सदर पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आणखीन ११ नवीन टाक्यांचा खोडा कामयच आहे. अमृत योजनेचे कामे जरी मंदगतीने करण्यात येत असले. तरही पाणी टाक्या बांधणे गरजेचे आहे. तपोवन या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र असून, याच ठिकाणी ६५ दशलक्ष लीटर क्षमतेचे आणखी नवीन जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे एकाचवेळी शहराला मुबलक पाणीपुरवठा शक्य होणार आहे. प्रति माणशी पुरवठा १२५ लीटर्स प्रतिदिन एवढा करण्यात येतो.

उच्च दाबाने व रात्री वाजताच्या आत शहरातील प्रत्येक प्रभागात पाणी पोहचवायचे असेल तर नवीन टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र व नवीन पाइपलाइनची कामे होणे गरजेचे आहे. अमृत योजनची कामे पूर्णत्वास गेल्यावर सर्व समस्यांवर मात करणे शक्य होणार आहे.
- सुरेश चारथळ, मुख्य अभियंता मजीप्रा, अमरावती

Web Title: Regular water supply only after the construction of the Jalakumbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.