कोरोनामुळे अनाथ नऊ बालकांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:29+5:302021-06-04T04:10:29+5:30

अमरावती : कोरोनामुळे अनाथ झालेल्या सात बालकांचा अहवाल गुरुवारी शासनाला सादर झाला. याशिवाय आणखी दोन नावे समोर आलेली आहे. ...

Rehabilitation of nine orphaned children due to corona | कोरोनामुळे अनाथ नऊ बालकांचे पुनर्वसन

कोरोनामुळे अनाथ नऊ बालकांचे पुनर्वसन

googlenewsNext

अमरावती : कोरोनामुळे अनाथ झालेल्या सात बालकांचा अहवाल गुरुवारी शासनाला सादर झाला. याशिवाय आणखी दोन नावे समोर आलेली आहे. अश्या एकूण सात बालकांच्या नावे प्रत्येकी पाच लाखांची मुदत ठेवण्यात येणार आहे. त्यांचे संगोपनासाठी कुणी तयार नसल्यास त्यांना बाल संगोपनगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी दिली. कोरोनामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याने काही बालकांच्या आई आणि वडिल अशा दोनही पालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अनाथ झालेल्या बालकांना आता शासन आधार देणार आहे. त्याशिवाय अन्य योजनांचा लाभ देऊन बालकांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बालसंगोपन योजनेच्या अनुदानात प्रतिबालक १,१०० रुपये, अशी भरीव वाढ करण्याचा शासनादेश जारी करण्यात आलेला आहे.

या अनाथ बालकांच्या मानसिक पुनर्वसनासोबतच त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे उपजीविकेचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईल यादृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

बॉक्स

पालक गमाविलेल्या या बालकांना लाभ

१८ वर्षे वयोगटातील बालके ज्यांचे दोन्ही पालक १ मार्च, २,२० किंवा त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे अनाथ झाले आहेत, अशी बालके; या कालावधीत कोविड संसर्गामुळे एका पालकाचा आणि इतर कारणाने दुसऱ्या पालकाचा मृत्यू झाला आहे, अशी बालके; तसेच या १ृ मार्च, २०२० पूर्वी कोणत्याही कारणाने एका पालकाचा आणि त्यानंतर कोविड संसर्गाने एका पालकाचा मृत्यू झाला आहे अशा बालकांना लाभ मिळणार आहे.

पाईंटर

पाईंटर

जिल्ह्यातील अनाथ बालके :०९

आई हिरावलेली बालके १६

वडील गमाविलेली बालके ६२

Web Title: Rehabilitation of nine orphaned children due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.