आदर्श शिक्षक पुरस्काराची दोन वर्षांपासून हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:17 AM2021-09-07T04:17:01+5:302021-09-07T04:17:01+5:30

अमरावती : शिक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराला दोन वर्षांपासून मुहूर्त हुलकावणी बसत आहे. शिक्षक दिनी महणजेच ...

Rejection of the Ideal Teacher Award for two years | आदर्श शिक्षक पुरस्काराची दोन वर्षांपासून हुलकावणी

आदर्श शिक्षक पुरस्काराची दोन वर्षांपासून हुलकावणी

Next

अमरावती : शिक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराला दोन वर्षांपासून मुहूर्त हुलकावणी बसत आहे. शिक्षक दिनी महणजेच ५ सप्टेंबरला हा पुरस्कार वितरण करण्याची परंपरा आहे. परंतु, जिल्हा परिषदेमार्फत दोन वर्षांपासून या पुरस्कार वितरणाला हुलकावणी मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

१४ पंचायत समिती अंतर्गत १४ प्राथमिक शिक्षक तसेच माध्यम विभागातून एका शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. यंदा म्हणजेच सन २०२१-२२ या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे १४ पंचायत समित्यांमधून यंदा शिक्षण विभागाकडे ४६ शिक्षकांचे ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. माध्यमिक शिक्षकांकडूनही यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अद्यापही निवड समितीकडून या प्रक्रियेतची कारवाई सुरू आहे. त्यामुळे शिक्षक दिन या पुरस्काराचे वितरण यावर्षी होऊ शकले नाही. विशेष म्हणजे, गतवर्षीचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अद्यापही या पुरस्काराचे वितरण करण्याचा मुहूर्त जिल्हा परिषदेमार्फत काढण्यात आला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये अधिकच नाराजी पसरली आहे.

बॉक्स

केव्हा निघणार मुहूर्त?

जिल्हा परिषदेमध्ये मार्फत दरवर्षी शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. परंतु, गतवर्षी कोरोना संसर्गामुळे पुरस्कार निवडण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही पुरस्कार वितरण करता आले नाही. यंदाही २९ ऑगस्टपर्यत पुरस्कारसाठी शिक्षकांकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविले होते. परंतु, प्रशासकीय सोपस्कार करण्यासाठी लागणारा वेळ आणि कोरोनाचा संसर्ग या दोन्हीमुळे यंदाची ही पुरस्कार रखडले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही वर्षातील पुरस्काराचा मुहूर्त केव्हा निघणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rejection of the Ideal Teacher Award for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.