अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:00 AM2017-12-26T01:00:30+5:302017-12-26T01:00:45+5:30

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सिझेरीयन झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दुपारी २ वाजता धुमाकूळ घातला.

Relatives of Achalpur sub-district hospital | अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा धिंगाणा

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा धिंगाणा

Next
ठळक मुद्देआकस्मिक मृत्यूची नोंद : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सिझेरीयन झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दुपारी २ वाजता धुमाकूळ घातला. डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप त्यांनी केला आहे.
उलनाज बानो शे.बिसमिल्ला (२१) रा. विलायतपुरा अचलपूर असे मृत बाळंतीणीचे नाव आहे. सदर महिलेचा ११ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पहिल्यांदाच गर्भवती असल्याने तिला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात २२ डिसेंबर रोजी भरती करण्यात आले होते. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता तिची सिझेरीयन झाली. तिने गोंडस मुलीस जन्म दिला. परंतु तिला आवश्यक प्रमाणात लघुशंका होत नसल्याने तिच्यावर उपचार करणारे डॉ.अमोल चिंचोळे यांच्या लक्षात येताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक जाकीर यांना रुग्णांची माहिती दिली. परतवाडा येथील खासगी डॉक्टरांना पाचारण करून त्यांनीसुद्धा तपासणी केली. त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रविवारी प्रकृती खालावत असल्याचे पाहून जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यास सांगितले. परंतु सोमवारी सकाळी १० वाजता महिलेचा मृत्यू झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले उपचार चुकीचे ठरवून नातेवाईकांनी धिंगाणा घातला.
नवजाताची प्रकृती धोक्याबाहेर
अचलपूर येथील डॉक्टरांनी प्रसूतीदरम्यान हलगर्जीपणा केल्यामुळे उलनाज बानोचा मृत्यू झाल्याचा आरोप उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी सोमवारी दुपारी २ वाजता करीत धिंगाणा घातला. उपस्थित डॉक्टरांनी त्यांची समजूत घातली. अमरावती व अचलपूर येथील चार डॉक्टरांच्या चमूने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले. वृत्त लिहिस्तोर पोलिसात कुठलीच तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

उलनाज बानोवर योग्य उपचार झाले. खासगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात आली. शवविच्छेदन अहवालवरून चूक कुणाची हे कळेल. नातेवार्इंकांचा रोष, योग्य होता. त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
- मो. जाकीर, अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर
 

Web Title: Relatives of Achalpur sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.