धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

By उज्वल भालेकर | Published: April 1, 2023 06:42 PM2023-04-01T18:42:02+5:302023-04-01T18:42:47+5:30

भारताला विश्वगुरु बनायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पयार्य नाही

Religion has become a riot factory in the country: Rajendra Pal Gautam | धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

googlenewsNext

अमरावती: देशात धर्माचा आधार घेवून दंगे घडविण्याचे काम सुरु आहे. परंतु दंगे घडविणारा मुख्य सुत्रधाराला अटक हाेत नाही. सध्या धर्म देशामध्ये दंगे घडविणारा कारखाना असून, यातून अनेक लोक हे खरबोपती झाले आहेत. या लोकांचे देशावर, येथील लोकांवर प्रेम नसून त्यांचा फक्त सत्ता व पैश्यावरच प्रेम आहे. भारत देशाला जर खऱ्या अर्थाने विश्वगुरु बनवायचे असेल, तर बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे मत दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र गौतम पाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारमध्ये सामाजीक न्यायमंत्री राहिलेल्या राजेंद्र गौतम पाल यांना ५ ऑक्टोंबर २०२२ मध्ये बौद्ध धम्म दिक्षा कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे सामूहीक वाचन केले होते. यावेळी या प्रतिज्ञावरुन भाजपने राजेंद्र गौतम पाल आणि आम आदमी पार्टी हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. तसेच राजेंद्र गौतम पाल यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागणी देखील केली होती. यानंतर राजेंद्र गौतम पाल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु हा राजीनामा कोणत्याही दबवात दिला नाही, समाजासाठी अधिक काम करण्यासाठी हा राजीनामादिल्याचे त्यांचे म्हणने आहे. सध्या ते भारत बौद्धमय करण्यासाठी देशभरात फिरत आहेत. त्याच अनुषंगाने ३१ मार्च रोजी शहरातील भिमटेकडी परीसरात त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत करतांना देश सध्या वाईट परिस्थितीचा सामना करत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी २००२ मध्ये झालेल्या गोदरा हत्याकांडाचाही उल्लेख करत, या दंग्यामध्ये सर्वाधिक कारवाई ही मागासवर्गीयांवर झाल्याची माहिती दिली. मागासवर्गीयांचा फक्त दंग्यासाठी उपयोग केला जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाने एकत्र येऊन मनुवादी व्यवस्थेचा विरोध केला पाहीजे. बहुजनांना एकत्रकरुन भारत बौद्धमय करण्याच उद्देश असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. गौतम मोरे, किरण गुडधे, राजेश वानखडे, एस.बी. खोबरागडे, रविकांत गवई, हरिश मेश्राम, रविंद्र फुले उपस्थित होते.

अर्थव्यवस्था देवी, देवतांच्या फोटोमुळे सुधारणार नाही

आप नेता अरविंद केजरीवाल यांनी भारतीय अर्थव्यस्था सुधारण्यासाठी देवी, देवतांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली होती. या संदर्भात राजेंद्र पाल यांना प्रश्न केला असता, त्यांनी केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे. राजेंद्र गौतम पाल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी' या पुस्तकाच आधार घेऊनच देशातील आरबीआय बँकेची स्थापना झाली आहे. बाबाासाहेबांचे हे पुस्तकच देशाची अर्थव्यवथा मजबुत करु शकेल. देवी, देवतांच्या फोटोमुळे अर्थव्यस्था सुधारणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Religion has become a riot factory in the country: Rajendra Pal Gautam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.