मागणीच्या अर्धेच मिळतात ‘रेमडेसिविर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 05:00 AM2021-04-24T05:00:00+5:302021-04-24T05:01:02+5:30
कोरोना मार्च २०२० पासून सुरू आहे. कोविड रुग्णांवर नेमका कोणता उपचार करावा, याचे निदान डॉक्टरांना देखील लागत नाही. मात्र, कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले की बरे होतात, असा सुरात सूर मिसळला. आता अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची तुडुंब गर्दी होत आहे. ग्रामीण असो वा शहरी भाग असा दोन्ही क्षेत्रात हल्ली ‘रेमडेसिविर’ प्राप्त करण्यासाठी धावाधाव सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वाचे असलेल्या ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनची मागणी कमालीची वाढली आहे. रेमडेसिविर मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांच्या रांगा लागत आहे. मात्र, मागणी अधिक, पुरवठा कमी अशी जिल्हा आरोग्य यंत्रणेची स्थिती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गत पाच महिन्यांपूर्वी आलेला रेमडेसिविर’ इंजेक्शनचा साठा आतापर्यंत पुरविला जात आहे.
कोरोना मार्च २०२० पासून सुरू आहे. कोविड रुग्णांवर नेमका कोणता उपचार करावा, याचे निदान डॉक्टरांना देखील लागत नाही. मात्र, कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले की बरे होतात, असा सुरात सूर मिसळला. आता अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची तुडुंब गर्दी होत आहे. ग्रामीण असो वा शहरी भाग असा दोन्ही क्षेत्रात हल्ली ‘रेमडेसिविर’ प्राप्त करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. परिणामी शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याचे चित्र आहे. येथील डॉ, पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात रेमडेसिविरसाठी सकाळी ७ वाजतापासून रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागत आहे. दिवसभर उन्हा-तान्हात उभे राहण्यानंतर महत्प्रयासाने इंजेक्शन प्राप्त केल्या जात आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नियंत्रणात शासकीय उपजिल्हा रूग्णालय, सुपर स्पेशालिटी व पीडीएमसीच्या कोविड रुग्णालयात रेमडेसिविर पाठिवले जातात. डॉक्टरांची मागणी आणि रुग्ण संख्येच्या तुलनेत इंजेक्शन दिले जात असल्याची माहती आहे. मात्र, कोरोना रुग्णांना वेळीच योग्य उपचार व्हावा, यासाठी रेमडेसिविर उपलब्ध करावे, अशी मागणी आहे.
कोरोना रुग्णांवर उपचाराठी ‘रेमडेसिविर’ची मागणी वाढली आहे. दररोज १५० ते २०० असे व्हायल मिळत असून, रुग्णांचे नातेवाईक ३५० ते ४०० पर्यंत नोंदणी करतात. मात्र, उपलब्धतेनुसार ‘रेमडेसिविर’ देण्यात येत आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच हे इंजेक्शन दिले जाते.
- अनिल देशमुख
अधिष्ठाता, पीडीएमसी.
कोरोना संसर्गाचा वेग लक्षात घेता रूग्णांना वेळीच उपचार मिळणे काळाची गरज आहे. अनेक कोरोना बाधित रुग्णांना ‘रेमडेसिविर’ मिळत नाही. खासगी रुग्णालयात चढ्या दराने ते विकले जात आहे. मात्र, शासकीय रुग्णालयात ‘रेमडेसिविर’चा तुटवडा होत आहे. हे चित्र बदलले पाहिजे.
- प्रमाेद महल्ले
नागरिक, राधानगर