रेमडेसिविरचा काळाबाजार, आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:41+5:302021-05-14T04:13:41+5:30

अमरावती : बनावट ग्राहक पाठवून शहरातील रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा पीडीएमसीत ...

Remadesivir black market, another arrested | रेमडेसिविरचा काळाबाजार, आणखी एकाला अटक

रेमडेसिविरचा काळाबाजार, आणखी एकाला अटक

Next

अमरावती : बनावट ग्राहक पाठवून शहरातील रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा पीडीएमसीत कार्यरत एका कंत्राटी वाॅर्डबॉयला पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केली. आता आरोपीची संख्या सात झाली असून, याप्रकरणी दोन कंत्राटी वाॅर्डबायची हकालपट्टी केली. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत एका लॅब टेक्निशियन व दोन डॉक्टरांवर कारवाईसाठी प्रस्ताव तातडीने पाठविला. यात तिवसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर कार्यरत एका डॉक्टराचा तसेच ‘एनआरएचएम’मध्ये कार्यरत डॉक्टरांचा समावेश आहे. हा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य उपसंचालकांकडे पाठविला आहे.

शहर गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, विनीत अनिल फुटाणे (२१, रा. खराळा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो पीडीएमसीत कंत्राटी वाॅर्डबॉय होता. त्याला बुधवारी रात्री पीडीएमसीतून अटक केल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी दिली. आरोपींकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी १५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला; तर बुधवारी दोन रेमडेसिविर जप्त केले.

बॉक्स

दोन कंत्राटी अटेंडंटची हकालपट्टी

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी तीन कंत्राटी अटेंडंटची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत अटेंडंट आरोपी शुभम कुमोद सोनटक्के (२४, रा. चपराशीपुरा) याला कोविड हॉस्पिटलने कार्यमुक्त केल्याची माहिती सीएस श्याम सुंदर निकम यांनी सांगितले. महावीर हॉस्पिटलमध्ये अटेंडंट असलेला शुभम शंकर किल्हेकर (२४, रा. वडाळी) याल हॉस्पिटलने तातडीने काढून टाकले.

बॉक्स

दोन डॉक्टरांचा कारवाईसाठी प्रस्ताव

काळाबाजार करताना आढळून आलेला तिवसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक असलेला तथा डॉ. पवन दत्तात्रय मालुसरे (३५, रा. कॅम्प रोड फ्रेजरपुरा) याच्या चारचाकी वाहनातून पाच रेमडेसिविर जप्त करण्यात आले. त्याचे नाव समोर येताच सीएस श्यामसुंदर निकम यांनी त्याच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भातकुली येथे एनआरएचएम अंतर्गत काम करणारा डॉ. अक्षय राठोड व एचआयव्ही कार्यक्रमात कंत्राटी टेक्निशियन असलेला संजीवनी हेल्थ केअर सेंटरला कार्यरत टेक्निशियन अनिल पिंजरकर याचाही कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला.

बॉक्स

पॉझिटिव्ह रुग्णाला ठेवले तात्पुरत्या कारागृहात

कोविड पॉझिटिव्ह आरोपीकरिता तात्पुरते कारागृहाची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी त्यांना ठेवून त्यांच्यावर कोविडचा उपचार केला जातो. अटकेतील आरोपींपैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना या कारागृहात ठेवण्यात आले आहे. १५ दिवसांनंतर त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येईल, अशी मागणी गुन्हे शाखेने दिली.

बॉक्स :

तो करीत होता आयसीयूमध्ये काम

पीडीएमसी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी अटेंडंट विनीत अनिल फुटाणे (२१, रा. खराळा) याला पोलिसांनी अटक केली. तो पीडीएमसीतील मेडिसिन आयसीयूमध्ये अटेंडंटमधून काम करीत होता, त्याची नेमणूक एका एजन्सीमार्फत करण्यात आली होती; तसेच तो एका खासगी कोविड रुग्णालयातही काम करीत होता. त्याची माहिती घेऊन त्याला काढून टाकण्यासंदर्भाचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात येईल, असे डीन अनिल देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Remadesivir black market, another arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.