उल्लेखनीय रक्तदात्यांचा लोकमत रक्तदान शिबिरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:15+5:302021-07-10T04:10:15+5:30

यात अचलपूरमध्ये रक्तदान चळवळ मजबूत करीत शेकडो रक्तदात्यांची फळी उभारणारे सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व, रक्तदान चळवळीतील अवलिया विनय चतुर आणि आतापर्यंत ...

Remarkable blood donors felicitated at Lokmat Blood Donation Camp | उल्लेखनीय रक्तदात्यांचा लोकमत रक्तदान शिबिरात सत्कार

उल्लेखनीय रक्तदात्यांचा लोकमत रक्तदान शिबिरात सत्कार

Next

यात अचलपूरमध्ये रक्तदान चळवळ मजबूत करीत शेकडो रक्तदात्यांची फळी उभारणारे सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व, रक्तदान चळवळीतील अवलिया विनय चतुर आणि आतापर्यंत नव्वद वेळा रक्तदान करणारे परतवाडा येथील नगरसेवक गोवर्धन मेहरे व ७५ वेळा रक्तदान करणारे अचलपूर येथील गजानन चापके यांचा प्राचार्य डॉक्टर काशिनाथ बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते लोकमतच्या वतीने करण्यात आला.

तर पंचवीस वेळा रक्तदान करणाऱ्या अचलपूर येथील महिला रक्तदात्या मंगला पोंदे यांचा सत्कार आय. ई. एस. गर्ल्स हायस्कूलच्या ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका व माजी प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता कडू यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी गुरुकुल पब्लिक स्कूलचे अध्यक्ष रवींद्र गोळे व लोकमत अमरावतीचे सहायक वितरण व्यवस्थापक रवींद्र खांडे उपस्थित होते.

---आम्ही सामान्यच---

परतवाडा येथे बुधवार सात जुलैला पार पडलेल्या लोकमत रक्तदान शिबिरात अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व तहसीलदार मदन जाधव यांनी रक्तदान केले. रक्तदानापूर्वी भरून द्यावयाचा फॉर्म त्यांनी अगदी सर्वसामान्यपणे अन्य रक्तदात्यांसमवेत भरून दिला. रक्तदानानंतर अन्य रक्तदात्यांप्रमाणेच त्यांनीही खाली चटईवर बसून चहा-बिस्किटे घेतलीत. रक्तदान शिबिरातील त्यांची उपस्थिती आणि सहभाग अगदी सर्वसामान्य राहिला. यात ते लक्षवेधक ठरलेत.

--- उपलब्धी----

या रक्तदान शिबिरात रक्तदाते रक्तदान करीत असतानाच, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल महिला रुग्ण रचना संतोष रावत (५०)यांना ए. बी. पॉझिटिव्ह ग्रुपच्या रक्ताची आवश्यकता भासली. संतोष रावत लोकमत रक्तदान शिबिरात दाखल झालेत. लोकमतचे अचलपूर शहर प्रतिनिधी संतोष ठाकूर आणि विनय चतुर यांचया माध्यमातून त्यांनी शिबिरात उपस्थित डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी त्या महिला रुग्णांकरिता ते रक्त उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.

दि9/7/21 फोटो

Web Title: Remarkable blood donors felicitated at Lokmat Blood Donation Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.