कारागृहात स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:32 AM2019-08-15T01:32:15+5:302019-08-15T01:32:40+5:30

गुरुवारी भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आजही भारतीयांच्या मनावर कोरल्या आहेत.

Remembrance of the freedom struggle in prison | कारागृहात स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृती

कारागृहात स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृती

Next
ठळक मुद्दे१९३० ते १९४४ दरम्यान कैद

व्ही.व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी यांनाही कारावास
गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुरुवारी भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आजही भारतीयांच्या मनावर कोरल्या आहेत.
अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात १९३० ते १९४४ या काळात ५१ स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी कारावास भोगला. यात माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, शिवाजीराव पटवर्धन यांचाही समावेश होता.
ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वधर्मीयांनी लढा दिला. ९ आॅगस्ट १९४२ च्या ‘चलो जाव’च्या संदेशानंतर स्वातंत्र्यलढ्याचे रान पेटले. देशवासी रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींना ब्रिटिश शासनकर्त्यांनी तुरुंगात डांबले. ज्या तुरुंगात त्यांना कारावास भोगावा लागला, तेथील बराकीत आजही भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला उजाळा देतात. येथील मध्यवर्ती कारागृहात एक-दोन नव्हे, तर तब्बल ५१ जणांना कारावास झाला होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींचे जतन, संरक्षण कारागृह प्रशासन आजही करते. स्वातंत्र्य दिन, शहीद दिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या स्मृतिस्थळाचे पूजाअर्चा करुन स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले जाते. १५ आॅगस्ट रोजी त्याअनुषंगाने कारागृह प्रशासनाने तयारी चालविली आहे.
७२ वर्षांपासून ‘त्या’ बराकी रिकाम्याच
येथील मध्यवर्ती कारागृहात १९३० ते १९४४ या कालावधीत ५१ स्वातंत्र्य संग्राम सेनानींना कारावास झाला होता. त्यावेळी दोन बराकीत स्वातंत्र्य सेनानींना ठेवण्यात आले होते. १५ आॅगस्ट १९४७ रोजी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आजतागायत या दोन्ही बराकीत एकही बंदीजन ठेवण्यात आला नाही. या बराकी आजही स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृती म्हणून रिकाम्या ठेवल्या जातात.
या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी भोगला कारावास
एम. पल्लम राजू, के.आर. कारंथ, के.पी. अग्नेश्वरिया, सी.एन.एम. मुदलियार, आर. नायडू, एम. अप्पलस्वामी, पी. गणपथीराव, के. कलेस्वामी राव, आर.सी. भारती, सी. चट्टेयार, के.के. रेड्डी, एम.बी. नायडू, एम. अनंतशय्यानम अय्यंगार, के. कलप्पा, के.ए. दामोदर मेनन, ए. कुप्परस्वामी मुदलियार, ए. पिल्लाई, एस.एस. कुलकर्णी, व्ही.व्ही.गिरी, नीलम संजीव रेड्डी, एस. सत्यमूर्ती, के. कामराज, एम.भक्तवत्सलम्, आर. राघवमेनन, व्ही. राघवैया, टी. विश्वनाथन, कला व्यंकटराव, पी. सीवरनानन, लक्ष्मीनारायण मालाणी, सीताराम जाजू, पार्वतीबाई पटवर्धन, रघुनाथमल कोचर, वीर वामनराव जोशी, पी.बी. सदातपुरे, कांताबेन रतनलाल, रतनलाल बापूजी जैन, पंडित द्वारकाप्रसाद मिश्र, एम.व्ही. अभ्यंकर, शिवाजी पटवर्धन, संभाजी गोखले, पु.का. देशमुख, दिनकर कानडेशास्त्री, डी.बी. सोमण, जी.जी. भोजराज, जी.बी. खेडकर, नीळकंठ मुरारी घटवाई

स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृतिस्थळाचे गतवर्षी नूतनीकरण करण्यात आले. दरवर्षी दिन, औचत्य साधून येथे पूजाअर्चा करून स्मृती जागविल्या जातात. या बराकी स्वातंत्र्य लढ्यानिमित्त आजही ‘जैसे थे’ आहेत.
- रमेश कांबळे
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.

Web Title: Remembrance of the freedom struggle in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.