कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनबाबत संभ्रम दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:56+5:302021-05-06T04:12:56+5:30
वरूड : तालुक्यात विविध कोरोना लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड, तर काही ठिकाणी कोव्हॅक्सिन लस दिली जाते. यापैकी कोणती लस चांगली, ...
वरूड : तालुक्यात विविध कोरोना लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड, तर काही ठिकाणी कोव्हॅक्सिन लस दिली जाते. यापैकी कोणती लस चांगली, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. दुसऱ्या टप्प्यातील लस किती दिवसांनी घ्यायची, याबाबत कुठेही सुस्पष्टता दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करून केंद्रांवर नागरिकांचे मार्गदर्शन करण्याची मागणी तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्ष शैलजा वानखेडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले. दुसऱ्या टप्प्यातील लसींसाठी कुठे २८ दिवस, कुठे सहा आठवडे अंंतर हवे, असे सांगितले जाते. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. आरोग्य विभागाने संभ्रम दूर करून लसीकरण केंद्रावर माहिती फलक लावून जनजागृती करावी, अशी मागणी शैलजा वानखेडे यांनी केली.