ब्रिटिशकालीन पुलाचे नूतनीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 05:00 AM2021-10-30T05:00:00+5:302021-10-30T05:00:28+5:30
अमरावती दौऱ्यात ना. गडकरी यांच्याकडे आमदार पोटे यांनी अमरावतीकरांची ही मागणी रेटून धरली. १०० वर्षे पूर्ण झालेल्या रेल्वे पुलाचे नूतनीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे वास्तव आमदार पोटे यांनी ना. गडकरींच्या पुढ्यात मांडले. काही ठिकाणी पुलाला भेगा पडल्या असून, तो जीर्णदेखील झाला आहे. भविष्यात रेल्वे पूल नूतनीकरण न केल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, ही बाब आमदार पोटे यांनी लक्षात आणून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशन चौकातील ब्रिटिशकालीन पुलाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
अमरावती दौऱ्यात ना. गडकरी यांच्याकडे आमदार पोटे यांनी अमरावतीकरांची ही मागणी रेटून धरली. १०० वर्षे पूर्ण झालेल्या रेल्वे पुलाचे नूतनीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे वास्तव आमदार पोटे यांनी ना. गडकरींच्या पुढ्यात मांडले. काही ठिकाणी पुलाला भेगा पडल्या असून, तो जीर्णदेखील झाला आहे. भविष्यात रेल्वे पूल नूतनीकरण न केल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, ही बाब आमदार पोटे यांनी लक्षात आणून दिली. या पुलाचे सर्वेक्षण करून नवीन पद्धतीने आरओबी वाहनतळाची व्यवस्था असलेला, बांधकाम असलेला पुलाचा प्रस्ताव तयार करून निर्माण करावा. त्यामुळे राजकमल, जयस्तंभ चौकात होणारी वाहतूककोंडी सुटेल, असा विश्वास आमदार प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. ब्रिटिशकालीन रेल्वे पूल निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करावे, प्रशासकीय मान्यतेला सहकार्य करावे, अशी मागणी आमदार पोटे यांंनी ना. गडकरींकडे केली आहे.
यवतमाळ, परतवाडामार्ग सिमेंट क्राँक्रिटीकरण व्हावा
बडनेरा ते यवतमाळ, अमरावती ते परतवाडा मार्ग हा सिमेंट क्राँक्रिटीकरणाने निर्मित व्हावा, अशी मागणी प्रवीण पोटे यांनी केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गापैकी हे दोनच मार्ग सिमेंट काँक्रीटीकरण निर्मितीपासून वंचित आहे. या दोन्ही मार्गाच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार प्रवीण पोटे यांनी केली आहे.