रत्नापूर-कापूसतळणी रस्ता त्वरित दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:31+5:302021-08-01T04:12:31+5:30
वनोजा बाग : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर झालेला रस्ता कंत्राटदाराने दोन वर्षांपासून खोदून ठेवल्याने रत्नापूर गावातील नागरिकांच्या हालाला ...
वनोजा बाग : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर झालेला रस्ता कंत्राटदाराने दोन वर्षांपासून खोदून ठेवल्याने रत्नापूर गावातील नागरिकांच्या हालाला पारावार उरला नाही. हा रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रत्नापूर या गावचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंर्तगत सन २०१९ मध्ये मंजूर झाला. कंत्राटदाराने कामाला सुरुवात करण्यासाठी दोन वर्षांपासून रस्ता खोदून होता तो रस्ताही खराब केला. दोन हजार लोकसंख्येच्या गावातील नागरिकांना आता या रस्त्याने पायीसुद्धा जाता येत नाही. जवळ असलेली वाहने घरातच पडून आहेत. गावातून ये-जा कठीण झाली आहे. कुठलेही वाहन गावात येत नाही. आठ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम सुरू करावे, अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे शाखाप्रमुख प्रज्वल गिरनाळे व ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले. यावेळी सोपान साबळे, संदीप पाथरे, शेख जावेद, हर्षल गहलोत, सोपान वानखडे, गजानन काकड, हृषीकेश गिरनाळे, शाबिर खान फारूख खान तसेच गावकरी मंडळी उपस्थित होती.