शेतकरीविरोधी कायदे रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:08+5:302021-06-28T04:10:08+5:30
नांदगाव खंडेश्वर : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी नांदगांव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांनी केंद्र ...
नांदगाव खंडेश्वर : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी नांदगांव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांनी केंद्र शासनाविरोधात शनिवारी आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा देऊन निषेध केला. यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौसिल सदस्य सुनील मेटकर, गणेश अवझाडे, बाबाराव इंगळे, संतोष सुरजुसे, विनोद वैद्य, समशेरखाँ पठाण, ओमप्रकाश सावळे, लक्ष्मण भगवे, विनोद तऱ्हेकर, मोरेश्वर वंजारी, अमोल राजकुळे, माधव ढोके, योगेश अवझाडे, अरुण शिंदे, पंकज जावळकर, प्रतीक जिपकाटे, संतोष बागडे, रवि घाटे, रवि काळमेघ, मनोज गावनेर, मनोज वानखडे, लखन मेटकर आदींचा सहभाग होता.
===Photopath===
270621\img-20210627-wa0008.jpg
===Caption===
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे आंदोलन.