बाजार समितीत धुडगूस घालणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:21 PM2018-03-12T22:21:41+5:302018-03-12T22:21:41+5:30
नांदगाव खंडेश्र्वर येथे १० मार्च रोजी आ. वीरेंद्र जगताप व शेकडो कार्यकर्त्यांनी बाजार समितीत धुडगूस घालीत सभापती व संचालकांना मारहाण केल्याने झेडपीचे माजी सदस्य अभिजित ढेपे, बाजार समितीचे सभापती विलास चोपडे व संचालकांनी दोषींवर गुन्हे दाखल करून पोलीस संरक्षणाची मागणी निवेदनात केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : नांदगाव खंडेश्र्वर येथे १० मार्च रोजी आ. वीरेंद्र जगताप व शेकडो कार्यकर्त्यांनी बाजार समितीत धुडगूस घालीत सभापती व संचालकांना मारहाण केल्याने झेडपीचे माजी सदस्य अभिजित ढेपे, बाजार समितीचे सभापती विलास चोपडे व संचालकांनी दोषींवर गुन्हे दाखल करून पोलीस संरक्षणाची मागणी निवेदनात केली आहे.
बाजार समिती १० मार्च रोजी ढगाळ वातावरणामुळे बंद ठेवण्यात आली होती. यावेळी प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून शनिवारी आ. जगताप व कार्यकर्ते जबरीने आत शिरले व शासकीय चना खरेदीच्या उद्घाटनासाठी सोई सुविधेच्या मुद्यावर बाजार समितीचे विलास चोपडे, संचालक प्रभात ढेपे, विलास सावदे, वसंत मानके यांनी आमदारांना समजाविले. मात्र, काही न ऐकता आमदार व कार्यकर्त्यानी सभापती व ३ संचालकांसह बाजार समितीच्या कर्मचाºयांना मारहाण केल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. याप्रकरणी तक्रारीनंतरही कारवाई केली नाही. यावेळी उपसभापती ज्ञानेश्र्वर हांडे,संचालक विलास सावदे, वसंत मानके, प्रभात ढेपे, प्रभा गरपाल उपस्थित होते.
शासकीय हरभरा खरेदीसाठी मला निमंत्रणावरून मी बाजार समितीत गेलो. मात्र शेतकºयांचे हित न जोपासता राजकारण करत खरेदी बंद ठेवली. खोटे आरोप करणाºयांना कदापी भीक न घालता शेतकºयांसाठी कितीही गुन्हे दाखले झाले तरी चालेल
- वीरेंद्र जगताप, आमदार
उद्घाटनाचा अधिकार संचालक मंडळाचा आहे. यात संचालकांना आमंत्रित केले नाही. उलट प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून दहशत पसरविणे ही निंदनीय बाब आहे. धान्य खरेदीचे उद्घाटन केवळ श्रेयासाठीच केले आहे.
- अभिजित ढेपे,
माजी सदस्य, जिल्हा परिषद