पीक नुकसानाची माहिती तत्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:18 AM2021-09-09T04:18:15+5:302021-09-09T04:18:15+5:30
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्राचे नुकसान झाल्यास अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित केले जाते. ...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्राचे नुकसान झाल्यास अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित केले जाते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे दावा दाखल करता येतो.
विमा दावा मंजूर होण्यासाठी पीक नुकसानीची माहिती/पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमाधारकांनी गुगल प्ले स्टोरवरून क्रॉप इन्सुरन्स हे ॲप डाउनलोड करून त्यात पीक नुकसानाची माहिती भरावी. याची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास गावातील कृषी सहायकाकडे द्यावे, असे आवाहन, विभागीय सांख्यिकीय अधिकारी प्रीती रोडगे यांनी केले आहे.