व्यवस्थापनावर नोंदवा

By admin | Published: August 12, 2016 12:08 AM2016-08-12T00:08:35+5:302016-08-12T00:08:35+5:30

प्रथमेश सगणे या चिमुकल्यावर शंकरबाबा यांच्या आश्रम परिसरात झालेल्या खुनी हल्ल्याविरुद्ध आता मातंग समाज एकवटला आहे.

Report to management | व्यवस्थापनावर नोंदवा

व्यवस्थापनावर नोंदवा

Next

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे
अमरावती : प्रथमेश सगणे या चिमुकल्यावर शंकरबाबा यांच्या आश्रम परिसरात झालेल्या खुनी हल्ल्याविरुद्ध आता मातंग समाज एकवटला आहे. प्रथमेश हा मातंग समाजाचा आहे. शाळा मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक आणि व्यवस्थापन यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भुजाडणे यांच्या नेतृत्वात शासनाला करण्यात आली आहे.
प्रथमेश हा मातंग समाजाचा आणि गरीब आई-वडिलांचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर हा अत्याचार झाला. त्यामुळेच घडल्या प्रकाराबाबत प्रशासनासकट सर्वांनीच चुप्पी साधली. प्रकरण दडपण्यासाठी वसतिगृह, शाळा प्रशासन आणि व्यवस्थापन प्रयत्नरत आहेत.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवा
अमरावती : प्रथमेशसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे आश्रम परिसरात काय चालते, हे जनतेसमोर उघड झाले आहे. याप्रकरणातून बोध घेऊन शासनाने इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावीत. शंकरबाबांच्या आश्रम परिसरात असलेल्या शाळा, वसतिगृह आणि विद्यार्थ्यांसंबंधीच्या सर्वच मुद्द्यांची बारकाईने तपासणी करावी.
मातंग समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शिक्षणासाठी निश्चित करून दिलेला कोटादेखील भरला जात नाही, स्थिती इतकी विदारक आहे. बाहेरगावी शिक्षणासाठी मुलांना पाठविणारे आई-वडील संख्येने फारच कमी आहेत. या घटनेनंतर मातंग समाजात चुकीचा संदेश पोहोचला आहे. मुलांना शिक्षणासाठी पाठविणे धोक्याचेच, असा विचार अशिक्षित असलेला आमचा समाज करू लागला आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर आणि त्यांना बळ देणाऱ्यांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा लहुजी शक्तीसेनेने दिला आहे.

 

Web Title: Report to management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.