मनीष ठाकरेंविरूद्ध गुन्हा नोंदवा, अन्यथा न्यायालयात दाद मागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:37 PM2018-10-15T22:37:58+5:302018-10-15T22:38:27+5:30

आंबेडकरी चळवळीतील वरिष्ठ कार्यकर्ते सुदाम बोरकर यांच्यासह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना जातीभेदावरून धक्काबुक्की करणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी मागणी केल्याची माहिती सोमवारी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पत्रपरिषदेत दिली.

Report an offense against Manish Thakrey, otherwise ask for mercy in the court | मनीष ठाकरेंविरूद्ध गुन्हा नोंदवा, अन्यथा न्यायालयात दाद मागू

मनीष ठाकरेंविरूद्ध गुन्हा नोंदवा, अन्यथा न्यायालयात दाद मागू

googlenewsNext
ठळक मुद्देभीम आर्मीची मागणी : जातीभेद करीत धक्काबुक्की केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आंबेडकरी चळवळीतील वरिष्ठ कार्यकर्ते सुदाम बोरकर यांच्यासह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना जातीभेदावरून धक्काबुक्की करणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी मागणी केल्याची माहिती सोमवारी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पत्रपरिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. दरम्यान अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. त्यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्तेही १५४ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्दाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जाणार होते. दरम्यान आरटीओ मार्गावरील नियोजन भवनाच्या प्रवेशद्वारावर भीम आर्मी भारत एकता मिशनचे प्रदेश सचिव मनीष साठे, अमरावती जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर, शहरप्रमुख बंटी रामटेके, शहर उपप्रमुख प्रवीण बनसोड व हेमंत कोडापे हे पाच कार्यकर्ते पोहोचले. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना निवेदन देण्यासंदर्भात विनंती केली. बैठक झाल्यानंतर भेट होईल, असे सातव यांनी सांगितल्यानंतर भीम आर्मीचे कार्यकर्ते परत बाहेर गेले. परत काही वेळानंतर सर्व कार्यकर्ते प्रवेशद्वाराजवळ जमले आणि तेथे उपस्थित पोलिसांना आत जाण्यासाठी परवानगी मागू लागले. मात्र, पोलिसांना त्यांना आत जाऊ दिले नाही. दरम्यान फे्रजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्याकडे कार्यकर्त्यांनी विनंती केली. मात्र, वरिष्ठ अधिकाºयांनी मनाई केल्याचे चोरमलेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान कार्यकर्त्यांना डिटेन व्हायला निघाले असता, तेवढ्यातच गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे प्रवेशद्वाराजवळ आले आणि त्यांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकण्याचे फर्मान सुनावले. याबाबत सुदाम बोरकर यांनी ठाणेदारांना जाब विचारला असता, त्यांनी दुप्पटे टाकले तर नेता झाले का, तुमच्या बापाचे शहर आहे का, साल्यांनो सरळ वागा, नाही तर आम्हाला सरळ करता येते, असे बोलून सुदाम बोरकर यांचा हात पकडून धक्काबुक्की केल्याचे भीम आर्मीचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांना अनेक राजकीय नेते भेटले. मात्र, आम्हालाच भेटू का दिले गेले नाही. ठाणेदारांनी आमच्याशी भेदभाव केला. मागासवर्गीय समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ व अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप भीम आर्मीने पत्रपरिषदेतून केला आहे. ठाणेदारांची अशी वागणूक आमच्या भावना दुखावणारी असून, ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडेसुद्धा तक्रार करू, अशी माहिती भीम आर्मीचे सुदाम बोरकर यांनी दिली.
तक्रार घेतली नाही
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना 'डिटेन' केल्यानंतर त्यांनीही गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याविरुद्ध ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली. त्याची पोच भीम आर्मीला मिळाली आहे. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे सुदाम बोरकर यांनी सांगितले.

Web Title: Report an offense against Manish Thakrey, otherwise ask for mercy in the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.