वांझोट्या भुईमूगाचा अहवालही खोटा

By admin | Published: June 18, 2017 12:02 AM2017-06-18T00:02:55+5:302017-06-18T00:02:55+5:30

केवळ अस्मानीच नव्हे, तर सुलतानी संकटदेखील शेतकऱ्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागले आहे. भुईमूगाला शेंगाच लागल्या नाहीत.

The report of the Panjhal basin is also false | वांझोट्या भुईमूगाचा अहवालही खोटा

वांझोट्या भुईमूगाचा अहवालही खोटा

Next

कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या : तालुका कमेटीची कंपनीसोबत मिलीभगत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केवळ अस्मानीच नव्हे, तर सुलतानी संकटदेखील शेतकऱ्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागले आहे. भुईमूगाला शेंगाच लागल्या नाहीत. याची तक्रार करणाऱ्या तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांवर चौकशी करणाऱ्या समितीचीच तक्रार करण्याची वेळ आली. कंपनीच्या प्रतिनिधीसोबत मिलीभगत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या घेऊन खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
तिवसा तालुक्यातील मौजा मार्डी शिवारात काही शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीच्या तीएजी-२४ या वाणाचे भुईमूग बियाण्याची पेरणी केली. त्याची उगवणशक्ती समाधानकारक आहे. मात्र या भुईमूगाला जेमतेम तीन ते चारच शेंगा लागल्या.

लगतच्या शेतांचीही पाहणी
अमरावती : त्यामुळे हे बियाणे सदोष असल्याची तक्रार पिंपळखुटा येथील सुधाकर नारायनराव लुटे यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे ६ जून रोजी केली. त्यानुसार तालुकास्तर समितीव्दारा १७ मे रोजी लुटे व लगतच्या तीन शेतांची पाहणी केली. यासमितीत संशोधक डी.व्ही चंदनकर, तंत्र अधिकारी ए.पी.गांवडे, तालुका कृषी अधिकारी ए.एस.मस्करे, कृषी अधिकारी डी.एन.गिऱ्हे, दुकानदार प्रतिनिधी दर्शन मुंधडा, कंपनी प्रतिनिधी डी.आर. खंडारे यांच्यासह शेतकरी सुधाकर लुटे, हेमंत उइके व गजानन वानखडे आदींची यावेळी समितीच्या सचिवांनी कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्याचा आरोप लुटे यांनी कृषी विकास अधिकाऱ्याकडे दाखल तक्रारीत केला आहे. यावेळी सर्वांसमोर तिवसा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत अहवाल देतो, असे सर्वांसमोर सांगितले. त्यांच्याशी सातत्याने संपर्क केला असता त्यांनी बोलावून कित्येकदा परत पाठविले. प्रत्यक्षात १५ दिवसांनी म्हणजेच ३ जून रोजी अहवाल दिला. त्यामध्येदेखील प्रत्यक्ष स्थिती व अहवालात नमूद केलेल्या स्थितीत मोठी तफावत असल्याचा आरोप लुटे यांनी केला.

शेतकऱ्यांचा आरोप
समितीव्दारा १७ जूनला पाहणी केली. त्यावेळी अहवाल दिला नाही. मात्र कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्यात.
समितीच्या पाहणीच्या वेळी भुईमूग पिकाला ३ ते ४ पक्वव ७ ते ८ अपरीपक्व(अंडे) असताना १५ ते २५ पक्क्या शेंगा असल्याचे अहवालात चुकीचे नमूद केले आले.
प्रत्यक्षात भुईमुगाचे क्षेत्र ०.८० हेक्टर असताना १.८३ हेक्टर दाखविण्यात आले.

असा आहे अहवाल
सदर पीक वाढण्याच्या अवस्थेत आहे. फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमधील अधिकच्या तापमानामुळे पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. शेंगांची संख्या प्रतिझाड १५ ते २५ दरम्यान आहे. अंकुर, दाजरी व महाबीज तीएजे-२४ या वाणाची पेरणी असलेल्या क्षेत्राची पाहणी केली. व्हेजीटेटीव्ह ग्रोथवर अधिकच्या तापमानामुळे परिणाम झाला आहे. सदर बियाणे दोषरहित असल्याचे समितीचे मत आहे.

तालुकास्तरीय समितीने तक्रारीनुसार पाहणी केली. शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी मोर्शी यांच्याकडे अहवालाची शहानिशा करण्यास सांगितले आहे.
- उदय काथोडे,
कृषी विकास अधिकारी

तालुकास्तर समितीने पाहणी केली. त्यावेळी कोऱ्या कागदावर आमच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. अहवाल देण्यासाठी विनाकारण चकरा मारायला लावल्या. प्रत्यक्षात स्थिती व अहवाल यांच्यात तफावत आहे.
- सुधाकर लुटे,
शेतकरी, पिंपळखुटा

Web Title: The report of the Panjhal basin is also false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.