चिखलदऱ्यातील ‘त्या’ दोन्ही मुलींचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:11+5:30
तालुक्यातील दोन मुलींना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे मेळघाटात एकच खळबळ उडाली होती. त्यात पुणे येथून आलेल्या मेळघाट येथील मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सोमवारी आल्यानंतर गिरगुटी येथील दुसऱ्या मुलीच्या अहवालाची प्रतीक्षा लागलेली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : पुण्यावरून आलेल्या मेळघाटच्या मुलीसह अकोट येथून चिखलदरा येथील क्वारंटाईन कक्षात असलेल्या गिरगुटी गावातील दुसऱ्याही मुलीचा थ्रोट स्वॅब अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आल्याने अहवालाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रशासनासह स्थानिक तालुक्यातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
तालुक्यातील दोन मुलींना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे मेळघाटात एकच खळबळ उडाली होती. त्यात पुणे येथून आलेल्या मेळघाट येथील मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सोमवारी आल्यानंतर गिरगुटी येथील दुसऱ्या मुलीच्या अहवालाची प्रतीक्षा लागलेली होती. दरम्यान, तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि चार दिवसांपूर्वी तिचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला असता, शुक्रवारी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी लोकमत'ला दिली. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या काहींचा जीव भांड्यात पडला.
मेळघाटला स्थलांतरातूनच धोका
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील हजारो मजूर कामाच्या शोधात दरवर्षी मुंबई-पुण्यासह परराज्यात जातात. परंतु लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात ते परत आले असून अनेक मजूर अद्यापही परत येण्यासाठी धडपड आहेत. त्यांना तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या दोन्ही मुली बाहेरगावाहूनच आल्याने संशयित वाटताच तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
चिखलदरा तालुक्यातील दोन्ही मुलींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. एकीचा गत आठवड्यात, तर दुसरीचा अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला.
- माया माने,
तहसीलदार, चिखलदरा