संशोधन गुणवत्तापूर्ण, उच्च दर्जाचे व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 12:34 AM2016-03-22T00:34:13+5:302016-03-22T00:34:13+5:30

समाजाची व पयार्याने देशाची प्रगती व्हावी, त्या देशात राहणाऱ्या जनतेचा सुद्धा सर्वांगिण विकास व्हावा, ..

Research should be quality, high quality | संशोधन गुणवत्तापूर्ण, उच्च दर्जाचे व्हावे

संशोधन गुणवत्तापूर्ण, उच्च दर्जाचे व्हावे

Next

कुलगुरू सपकाळ : रिसर्च मेथोडॉलॉजीवर कार्यशाळा
अमरावती : समाजाची व पयार्याने देशाची प्रगती व्हावी, त्या देशात राहणाऱ्या जनतेचा सुद्धा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी संशोधन महत्त्वाचे असून संशोधनाची गुणवत्ता उच्चत्तम दर्जाची राहावी, यासाठी गृहविज्ञान विभागाच्यावतीने आयोजित रिसर्च मेथोडॉलॉजीवर कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कार्यकारी कुलगुरू विलास सपकाळ यांनी केले.
गृहविज्ञान विभागाच्यावतीने ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ अंतर्गत आठवडाभराच्या कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण भवनात शनिवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरू ग.व्यं. पाटील, प्रभारी बीसीयूडीचे संचालक आर.एस. सपकाळ, रिसोर्स पर्सन पी.ओ. इंगोले, कार्यशाळेचे समन्वयक तथा गृहविज्ञान विभाग प्रमुख मनीषा काळे आदी उपस्थित होते. थेअरी व प्रॅक्टिकल अशा दोन सत्रात ही कार्यशाळा घेण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञान, लाईफ सायन्स, सोशल सायन्स, होम सायन्स अशा गटांत ही कार्यशाळा झाली. प्रास्ताविक मनीषा काळे, संचालन उज्ज्वला शिरसाट, तर आभार प्रदर्शन एस.व्ही. देशमुख यांनी केले.
थेअरी सत्रासाठी राज्यातून जवळपास ७० प्रतिनिधी सहभागी झाले होते. जी.एन.वानखेडे, पी.ओ. इंगोले, आशिष लिंगे, विद्यापीठ ग्रंथपाल मोहन खेरडे, भोपळे, पी.आर. देशमुख, प्रात्यक्षिकासाठी अनुपमा बेदी, देशपांडे, आदींनी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.

Web Title: Research should be quality, high quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.