मेळघाटातील रानहळदीवर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:02+5:30

अंजनगावातील राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख मंगेश डगवाल यांनी रानहळदीवर संशोधन केले. याबद्दल त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. त्यांनी 'इन्फ्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी असेसमेंट इन कुरकुमा स्पेसिज फ्रॉम मेळघाट फॉरेस्ट, डिस्ट्रिक्ट अमरावती’ हा शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या माजी संचालक व वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रभा भोगावकर यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.

Research on the turf in Melghat | मेळघाटातील रानहळदीवर संशोधन

मेळघाटातील रानहळदीवर संशोधन

Next
ठळक मुद्देपीएचडी मिळविली : संरक्षण, संवर्धन आवश्यक; रूप-जनुकांमध्येही आढळतात बदल

सुदेश मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : मेळघाटात आढळणाऱ्या बहुगुणी रानहळदीवर येथील प्राध्यापकाने संशोधन करून पीएचडी मिळविली. रानहळद सर्वसाधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आढळत असली तरी ती मेळघाटच्या जंगलात मुबलक प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, समुद्रसपाटीपासून ७०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर ती आढळते.
अंजनगावातील राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख मंगेश डगवाल यांनी रानहळदीवर संशोधन केले. याबद्दल त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. त्यांनी 'इन्फ्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी असेसमेंट इन कुरकुमा स्पेसिज फ्रॉम मेळघाट फॉरेस्ट, डिस्ट्रिक्ट अमरावती’ हा शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या माजी संचालक व वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रभा भोगावकर यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
रानहळदीचा उपयोग मूळव्याध, जखमेवर अ‍ॅन्टिसेप्टिक म्हणूनसुद्धा केला जातो. मेळघाटातील आदिवासी बांधव त्यांच्या परंपरेनुसार रानहळदीचा उपयोग संमोहनाकरिता तसेच वशीकरण व मायाजाल या क्रियेमध्ये वर्षानुवर्षे करीत आले आहेत, असे संशोधन पुढे आले आहे. या वनस्पतीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे तिला येणारी फुले.
साधारणपणे एखाद्या स्थानावरून, जंगलातून तेथे आढळणाºया वेगवेगळ्या प्रजातींची नोंद केली जाते. मात्र, एकाच प्रजातीच्या वनस्पतींमध्ये आढळणारा वेगळेपणा सहसा नोंदविला जात नाही. काही वेळा एकाच प्रकारच्या वनस्पती जर वेगवेगळ्या भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीमध्ये वाढल्या, तर त्यांच्यात दृश्य- अदृश्य बदल होतात. मात्र, मेळघाटात एकाच भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत वाढणाºया रानहळदीची झाडे मात्र लक्ष वेधून घेणारे आहेत. त्यांच्यात वैविध्य आहे. हे वैविध्य रंग, रूप तसेच रासायनिक व जनुकीय अशा अदृश्य स्वरूपातही असल्याची नोंद डगवाल यांनी केली आहे.

रानहळदीचे संवर्धन व्हावे
कोणतीही नवीन प्रजाती एकाएकी तयार होत नाही. अस्तित्वात असलेल्या प्रजातीमध्येच बदल घडवून नवी प्रजाती तयार होत असते. रानहळदीसारख्या वैविध्य असणाºया वनस्पती भविष्यातील नवप्रजातीच्या उत्क्रांतीचा पाया असतात. त्यामुळे मेळघाटातील रानहळदीच्या पट्ट्यांचे संरक्षण व संवर्धन आवश्यक आहे. या दृष्टीने डगवाल यांनी घरीसुद्धा रानहळदीची लागवड केली आहे.

Web Title: Research on the turf in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल