शेतकऱ्यांनी स्वत:च व्हावे संशोधक
By admin | Published: January 31, 2017 12:32 AM2017-01-31T00:32:43+5:302017-01-31T00:32:43+5:30
पगारी कर्मचारी संशोधक होऊ शकत नाहीत. त्यामुळे संशोधनासाठी शासनावर अवलंबून न राहता
दादाजी खोब्रागडे : ‘तांदूळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन
अमरावती : पगारी कर्मचारी संशोधक होऊ शकत नाहीत. त्यामुळे संशोधनासाठी शासनावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वत:च स्वत:च्या शेतात संशोधन करावे आणि नवनवीन फायदेशीर वाणांची निर्मिती करावी. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ‘एचएमटी’ तांदळाच्या वाणाचे जनक, कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांनी केले.
फ्रेंड्स आॅफ फार्मर्स, कृषी समृद्धी शेतकी उत्पादन कंपनी व श्रमजीवी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांद्वारे उत्पादित तांदळाची ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी हा महोत्सवाचे आयोजित केला आहे. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड, शेतीतज्ज्ञ अरविंद नळकांडे, फ्रेंड्स आॅफ फार्मर्सच्या पौर्णिमा सवाई, ज्योत्स्ना ठाकरे आदींची उपस्थिती होती. दादाजी खोब्रागडे पुढे म्हणाले, शेतकरी आणि ग्राहकांमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांच्या साखळीतून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये ग्राहकांची फसवणूक तर होतेच पण शेतकरी देखील नाडवला जातो. अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ हा त्यातलाच एक प्रकार आहे. शेतकरी धान्यात कधीच भेसळ करीत नाही तर व्यापारी भेसळ करतात. त्यामुळेच ग्राहकांनीही शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांच्याकडून अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
कार्यक्रमाला फ्रेंड्स आॅफ फार्मर्सच्या रंजना झोंबाडे, ज्योत्सना ठाकरे, स्मिता पाटील, श्वेता खापेकर, पौर्णिमा सवई, रेखा जिचकार, माया पुसदेकर आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक कृषी समृद्धी प्रकल्पाचे रवि पाटील यांनी केले.
महिलांचाच पुढाकार
४‘फ्रेंड्स आॅफ फार्मर्स’ हा महिला शेतकऱ्यांचाच समूह असून या समूहातील महिलांनी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना शेतमालाच्या थेट विक्रीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने महिलांनीच प्रथम पुढाकार घेतला असून, हेच या तांदूळ महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.