बीएचआर सोसायटीला कुलूप लागल्याने संताप
By admin | Published: June 3, 2014 11:43 PM2014-06-03T23:43:16+5:302014-06-03T23:43:16+5:30
खोलापुरी गेट पोलीस ठाण्यातंर्गत सक्कसाथ परिसरात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (बीएचआर) स्थानिक शाखेला मंगळवारी सकाळी कुलूप लागलेले
पोलीस दाखल : बँकेसमोर खातेदारांचा रोष
अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्यातंर्गत सक्कसाथ परिसरात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (बीएचआर) स्थानिक शाखेला मंगळवारी सकाळी कुलूप लागलेले दिसल्याने खातेदारांनी बँकेसमोर संताप व्यक्त केला. अनेक खातेदार बँकेसमोर एकत्र आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही माहिती मिळताच खोलापुरी गेटचे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. खातेदारांना कोट्यावधीचा गंडा घातल्याचा आरोप येथे खातेदारांनी केला.
मुंबई, पुणे व अन्य शहरात या सोयायटीच्या १२२ शाखा आहेत. या सोसायटीची नोंदणी ३१ ऑगस्ट २00७ रोजी करण्यात आली असून मागील तीन वषर्ा्ंपूर्वी अमरावतीमध्येही तीन शाखा उघडण्यात आल्या आहेत. राजापेठ, सक्करसाथ या ठिकाणी दोन शाखा असून नुकतीच एक शाखा कॅम्प येथे उघडण्यात आल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. या सोयायटीकडे अमरावती शहरातील शेकडो खातेधारकांनी आपल्या पैश्याची गुतंवणुक केली आहे. मात्र आज मंगळवारी काही खातेदार बँकेत पैसे काढण्यास गेले असता त्यांना बँक बंद दिसली व लाखो रुपयांनी गंडा घालून ही बँक बंद केल्याची वार्ता खातेदारांपर्यंत पोहोचली. यामुळे या बँकेचे खातेदार बँकेसमोर एकत्र आले आणि काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. खातेदारांनी तक्रार करण्यास पुढे यावे, असे पोलिसांनी खातेदारांना सांगितले. परंतु पोलिसात तक्रार करण्यात कुणीही पुढाकार घेतला नाही. याबाबत खातेदारांनी चौकशी केली असता बँक बंद झाल्याची माहिती मिळाल्याचे ग्राहकांनी एकमेकांना सांगितले.