कोरोनायोद्ध्यांसाठी ऑक्सिजनचे १० टक्के बेड आरक्षित ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:48+5:302021-04-21T04:13:48+5:30
अमरावती : कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच त्याच्या कुटुंबांसाठी १० टक्के ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवावे, ...
अमरावती : कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच त्याच्या कुटुंबांसाठी १० टक्के ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, गत वर्षभरापासून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर व कोरोनायोद्ध्यांना जिल्ह्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या जिवाची पर्वा न करता आराेग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी व अन्य सहकारी दिवस-रात्र काम करीत आहेत. या लढ्यात काम करताना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे काेविड-१९ च्या लढ्यात अविरत सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता १० टक्के ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवावे व तसे आदेश जारी करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस तारकेश्वर घोटेकर, अध्यक्ष चंद्रशेखर काळे, व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.