राज्यात कोविड योद्ध्याकरिता ऑक्सिजन बेड राखीव ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:57+5:302021-04-19T04:11:57+5:30
वरूड : देशात कोविड योद्धा म्हणून २४ तास सेवा देणारे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक ...
वरूड : देशात कोविड योद्धा म्हणून २४ तास सेवा देणारे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकरिता राज्यात १० टक्के ऑक्सिजन बेड राखीव ठेवावेत, अशी मागणी समोर आली आहे. अनेकांचा ऑक्सिजन बेडअभावी प्राण गेला. खासगी रुग्णालयांत कोविड योद्ध्यांनासुद्धा पैसे मोजावे लागत असल्याची शोकांतिका आहे.
तालुक्यातील बहादा येथील वंदना फुलेकर या आशा वर्करचा ऑक्सिजन बेड न मिळाल्याने जीव गेला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कोविड योद्ध्यांकरिता ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्याचे आदेश सर्व जिल्हा प्रशासनाला देण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यानी केली आहे. गतवर्षी अनेक कोविड योद्ध्यांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार, तलाठी, ग्रामसेवक यांना तातडीने मोफत रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन बेडची सुविधा राज्य शासनाने द्यावी, अशी मागणी समोर आली आहे.
--------------