ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By प्रदीप भाकरे | Published: May 29, 2023 04:35 PM2023-05-29T16:35:14+5:302023-05-29T16:35:44+5:30
सोळंके नियंत्रण कक्षात
अमरावती : पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ग्रामीण पोलीस दलात अंतर्गत खांदेपालट केला. २९ मे रोजी त्यांनी सहायक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्यांचे आदेश पारित केले. नव्या आदेशानुसार, ब्राम्हणवाडा थडी चे ठाणेदार असलेले एपीआय पंकज दाभाडे हे आता चांदूररेल्वेचे प्रभारी अधिकारी अर्थात ठाणेदार असतील. तर अंजनगाव ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरिक्षक उल्हास राठोड हे ब्राम्हणवाडाचे नवे ठाणेदार असतील.
चांदूररेल्वे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक संदीप बिरांजे यांची बदली जिल्हा वाहतूक शाखेत करण्यात आली. त्यांच्या बदलीमुळे वाहतूक शाखा प्रमुख गोपाल उंबरकर यांना सहकारी मिळाला आहे. तर, चांदूररेल्वे पोलीस ठाण्यातील अन्य सहायक पोलीस निरिक्षक मनोज सुरवाडे यांची बदली अंजनगाव ठाण्यात करण्यात आली. सहायक पोलीस निरिक्षक विष्णू पांडे हे आता शिरखेडऐवजी मोर्शी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतील. तर, चांदूररेल्वेचे ठाणेदार सुनिल सोळंके यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे.
धारणी व मंगरूळ चव्हाळा येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सुयोग महापुरे व प्रमोद काळे यांना चांदुररेल्वे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर पाठविण्यात आले आहे. आठही अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत संबंधित ठिकाणी कर्तव्यावर पाठविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे