दोन वर्षांत नव्या सभासदांना संधी न दिल्यास राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:00 PM2017-09-08T23:00:20+5:302017-09-08T23:00:47+5:30

संस्थेच्या घटनेमध्ये तरतूद नसल्यामुळे नव्या सभासदांची नोंदणी करता येत नाही, अशी दिशाभूल आजवर प्रस्थापितांनी केली.

Resignation if new members do not get opportunity in two years | दोन वर्षांत नव्या सभासदांना संधी न दिल्यास राजीनामा

दोन वर्षांत नव्या सभासदांना संधी न दिल्यास राजीनामा

Next
ठळक मुद्देबाळासाहेब सपकाळ : उपविधीच्या नावाआड प्रस्थापितांचे राजकारण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संस्थेच्या घटनेमध्ये तरतूद नसल्यामुळे नव्या सभासदांची नोंदणी करता येत नाही, अशी दिशाभूल आजवर प्रस्थापितांनी केली.मात्र भाऊसाहेबांच्या निधनानंतर १९७६ मध्ये घटनेची दुरूस्ती कशी केली, असा सवाल विकास पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जगताप यांनी शुक्रवारी केला. आम्ही दोन वर्षात नव्या सभासदांची नोंदणी करू, अन्यथा राजीनामा देवू असे अभिवचन त्यांनी दर्यापूर, मुर्तिजापूर, अकोट व अकोला येथील सभेत दिले. शिवपरिवारातील आजिवन सदस्यांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते.
भाऊसाहेबांच्या निधनानंतर १९६७ मध्ये घटनादुरूस्ती करण्यात आली. तीच घटना आज अस्तित्वात आहे. याच घटनेत १९७६ मध्ये नवीन सभासदांची नोंदणी करण्यात आली. मात्र सोयीच्या राजकारणासाठी घटनेत तरतूद नसल्यामुळेच नवीन सभासद नोंदणी करता येत नाही, असे सांगत प्रस्थापितांनी आजवर शिवपरिवाराची दिशाभूल केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. नवीन सभासदांची नोंदणी टाळणे हे प्रस्थापितांचे सोयीचे राजकारण आहे. निवडणुका आल्या की विविध पॅनेल व उमेदवार नव्या सभासदांची नोंदणी करण्याचे आश्वासन देतात, नंतर त्यांना विसर पडतो. भूलथापा देणे व स्वार्थ साधने असेच आजवर होत आले आहे. आजीवन सभासदांमध्ये या विषयासंदर्भात विश्वसनियतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्यावर एकदा विश्वास टाकून बहुमताने निवडून द्या, दोन वर्षांच्या आत नवीन सभासदांची नोंदणी करू, अन्यथा संपूर्ण विकास पॅनेल राजीनामा देईल, हाच आमचा वचननामा आहे, अशी निर्धारपूर्वक ग्वाही सपकाळ यांनी दिली. उपस्थितांनी त्यांच्या या महत्त्वपूर्ण मुद्द्याला भरभरून दाद दिली. डी.एम.वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकोट येथील संवाद सभेला जेष्ठ सभासद माणिकराव पोटे, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार गजाननराव इंगोले, जगन्नाथ वानखडे, उत्तमराव यादगीरे, कोषाध्यक्षपदाचे राजीव इंगोले, सदस्यपदाचे उमेदवार बाबासाहेब घोरपडे, मोहनराव जायले, बाळासाहेब वैद्य, नीळकंठराव आंडे आदी उपस्थित होते.
भाऊसाहेबांच्या भावनांचा विसर
भाऊसाहेबांनी ज्या भावनेने शिवपरिवाराची स्थापना केली त्याचा सोईस्कर विसर प्रस्थापितांना पडला आहे. सतत दिशाभूल करण्यात येत असल्याने वेळीच सर्व सभासदांनी सावध राहावे, असे भावनिक आवाहन संस्थेचे अकोट येथील ९५ वर्षांचे वयोवृद्ध सभासद माणिकराव पोटे यांनी केले. या निवडणूक निमित्याने युवा पिढीचा सहभाग घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी प्रस्थापितांवर बोचरी टीका केली.

Web Title: Resignation if new members do not get opportunity in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.