दुष्काळावर मात करण्यासाठी सावंगावासीयांचा संकल्प
By admin | Published: May 14, 2017 12:09 AM2017-05-14T00:09:52+5:302017-05-14T00:09:52+5:30
प्रत्येकाला आता पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळेच तालुक्याला जलयुक्त करण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून एकजुटीने प्रयत्न सुरू केला आहे.
संकल्प : वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून एकजुटीने प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : प्रत्येकाला आता पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळेच तालुक्याला जलयुक्त करण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून एकजुटीने प्रयत्न सुरू केला आहे. आता हा परिसर लवकरच ड्रायझोनमुक्त होणार यात तिळमात्र शंका नाही. असे उद्गार सावंगा येथे श्रमदान करतेवेळी मोर्शी - वरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बोंडे यांनी गावकऱ्यांशी बोलताना व्यक्त केले.
आ. अनिल बोंडे पुढे म्हणाले कि, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सावंगा गावाने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठा सहभाग घेऊन उंच भरारी घेतली आहे. "पाणी अडवा, पाणी जिरवा" ही संकल्पना गावकऱ्यांच्या श्रमदानातून अस्तिवात आली. त्यामुळेच गावातील श्रमदाते गाव परिसरात पाणी साठवण करून त्याला जमिनीमध्ये निचरा करण्यात यशस्वी होत आहे.
या लोकसहभागातील विकास कामामुळे गावाला मोठा फायदा नक्कीच होणार आहे. त्यामुळे दुष्काळावर मात करण्याचा हा संकल्प गावक?्यांनी घेतला आहे.
यावेळी वरूडचे तहसीलदार आशिष बिजवल, कमलाकर देशमुख, गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, पाणी फाउंडेशनचे अतुल काळे, नगरसेवक संतोष निमगरे, जानराव लोखंडे, दिनेश आंडे, आशिष सोनारे, पप्पू आंडे, नीलेश काळे, विनोद चौधरी, अशोकराव दिघे यांच्यासह गावातील नागरिक व श्रमदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.