Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांना निवडून आणण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:24 AM2019-04-04T01:24:28+5:302019-04-04T12:48:28+5:30

महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणणारच, असा संकल्प युवक काँग्रेसच्या तरुणांनी येथील अभियंता भवनात बुधवारी केला.

Resolve to choose Navneet | Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांना निवडून आणण्याचा संकल्प

Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांना निवडून आणण्याचा संकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणणारच, असा संकल्प युवक काँग्रेसच्या तरुणांनी येथील अभियंता भवनात बुधवारी केला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट) रिपाइं (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा स्वाभिमानी पक्ष व मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ बुधवारी येथील अभियंता भवनात अमरावती व बडनेरा विधानसभा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी तरुणाईने हा संकल्प सोडला.
नवनीत राणा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, त्यांचे हात बळकट करावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केले.
नवनीत यांच्या विजयासाठी सर्व युवक दहा दिवस संपूर्ण ताकदीनिशी प्रचार करणार आहेत. त्यांना निवडून आणल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे वचन युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिले.
ही लढाई आता अस्तित्वाची आहे. प्रत्येक घरापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मंदिर, मशिदीलाही आम्ही भेटी देणार असल्याचे यावेळी आमदार राणा यांनी सांगितले. मेळाव्यात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष देवयानी कुर्वे, नितीन बोरेकर, मो. आसिफ, अल्पसंख्याक अध्यक्ष एजाज पहेलवान, महासचिव नासिम खान, फिरोज शाह, अभिजित देशमुख, समीर जिलानी, गुड्डू हमीद, संकेत कुलट, बडनेरा विधानसभा अध्यक्ष योगेश बुंदेले, प्रदेश महासचिव समीर जवंजाळ, नीलेश गुहे, मो. जावेद, काका तिवारी, राजा बांगडे, रोहित वैद्य, नारायण यादव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
‘पाना’ चिन्हाची मोहीम
नवनीत राणा यांच्या ‘पाना’ या बोधचिन्हाच्या प्रचाराची जोरदार मोहीम आघाडीने उघडली आहे. ‘पाना’ चिन्हाचे बॅनर, पोस्टर सर्वच मंचांवर प्रदर्शित केले जात आहे.

Web Title: Resolve to choose Navneet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.