डॉ, आंबेडकरांना आज आदरांजली, इर्विन चौकात गर्दी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:12 AM2020-12-06T04:12:33+5:302020-12-06T04:12:33+5:30
अमरावती : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रविवार, ६ डिसेंबर रोजी ६४ वा महापरिनिर्वाण दिन ...
अमरावती : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रविवार, ६ डिसेंबर रोजी ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे गर्दी, यात्रेला परवानगी नाही. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी केवळ आदरांजली अर्पण करण्याचे नियोजन केले आहे. परित्राणपाठ या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासह बिगुलवर बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाणार आहे.
दरवर्षी डॉ, आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी येथील इर्विन चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. डॉ. बबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याला सकाळपासून तर मध्यरात्रीपर्यंत आंबेडकरी अनुयायी, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संघटनांमार्फत आदरांजली वाहण्यात येते. फुलांच्या हारांनी डॉ. आंबेडकरांचा पुतळा झाकोळला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा, उत्सव, गर्दीच्या कार्यक्रमांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मनाई केली आहे. परंतु, डॉ. आंबेडकर अनुयायांनी कोरोना नियमावलींचे पालन करीत छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. फिजिकल डिटन्स, सॅनिटाईझ आणि सुरक्षितता ठेवत परित्राणपाठ धार्मिक कार्यक्रम होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आक्रमण संघटनेच्यावतीने बिगुुलवर आदरांजली वाहिली जाणार आहे. कोरोना नियमावलीचे पालन करीत अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.