बडनेरयात ठिकठिकाणी महामानवाला आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:12+5:302021-04-15T04:12:12+5:30

बडनेरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून बडनेरा शहरात विविध ठिकाणी अभिवादन तसेच ...

Respect to Mahamanwala at various places in Badnera | बडनेरयात ठिकठिकाणी महामानवाला आदरांजली

बडनेरयात ठिकठिकाणी महामानवाला आदरांजली

Next

बडनेरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून बडनेरा शहरात विविध ठिकाणी अभिवादन तसेच हारार्पणाने साजरी करण्यात आली.

शहरातील अशोकनगर, समता चौकातील पुतळ्याच्या ठिकाणी हारार्पण व अभिवादन करण्यात आले तसेच सिद्धार्थ वाचनालय, पंचशील वाचनालय, भारतीय बौद्ध महासभा, लुम्बिनी बुद्धविहार, जेतवन बुद्ध विहार, सुजाता बुद्धविहार, समता सैनिक दल, पंचशील कल्याण बहुउद्देशीय संस्था, वॅगन कारखाना, आधार शहरी बेघर केंद्र तसेच इतरही ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश बनसोड, प्रकाश बोरकर, सिद्धार्थ बनसोड, सुरेंद्र टेंभुर्णे, विलास साखरे, सतीश भालेराव, केतन देशपांडे, विलास वाडेकर, अशोक नंदागवळी, विठ्ठल मेश्राम ,मधुकर कापसे, प्रकाश गजभिये, अजय भालेराव, प्रकाश डोंगरे, मधुकर साखरे, मनोज गजभिये, उमेश मेश्राम, सतीश सहारे, रोशन चव्हाण, प्रकाश दातार, महेंद्र बागडे, अष्टशील बोरकर, उज्ज्वल मेश्राम आदींनी सहभाग होता. शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी देखील अभिवादन कार्यक्रमात भाग घेतला होता.

Web Title: Respect to Mahamanwala at various places in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.