वरूड येथे महाराजस्व अभियानाला प्रतिसाद

By admin | Published: September 6, 2015 12:06 AM2015-09-06T00:06:16+5:302015-09-06T00:06:16+5:30

समाजाचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना मायबाप ...

Response to Lord Shiva's campaign at Worood | वरूड येथे महाराजस्व अभियानाला प्रतिसाद

वरूड येथे महाराजस्व अभियानाला प्रतिसाद

Next

प्रवीण पोटे : मायबाप समजून नागरिकांची कामे करा
वरुड : समाजाचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना मायबाप समजून कामे करण्याचे कळकळीचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित महाराजस्व अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले की, ज्या सरकारने साठ वर्षांत केले नाही ते आम्ही नऊ महिन्यांत करून दाखविले. जलशिवार योजनेअंतर्गत २४१ टीएमसी पाण्याची उपलब्धता होऊन १५ हजार हेक्टर जमिनीची सिंचन व्यवस्था झाली. शासनाच्या लोकहिताच्या अनेक योजना आहेत. त्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचत नाही. याकरिता कार्यकर्त्यांनी पुढे येऊन कार्य करावे. या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना घेता येईल. आम्ही मंत्री जरी असलो तरी जनतेचे सेवक आहोत, हे विसरुन चालणार नाही. अधिकारी हा शासनाचा चेहरा असता. तो पारदर्शीर् असणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी कामात हयगय केल्यास आम्हाला कळवा. त्याला वठणीवर आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही पोटे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाहून आ. अनिल बोंडे यांनी सांगितले की, तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. नागठाणा २, भेमडी, झटामझीरी तसेच पवनी प्रकल्प आहे. भ्रष्टाचारामुळेच पंढरी प्रक्लपाचा कंत्रादार जेलमध्ये गेल्याचेही सांगण्यास ते विसरले नाही. यावेळी आ. अनिल बोंडे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्ष सरिता चेरडे, पंचायत समिती सभापती निता जिचकार, वसुधा बोंडे, जि.प.सदस्य अर्चना मुरुमकर, सुनीता डाहाके, बबन लायदे पाटील, प्रभाकर काळे, रमेश देशमुख, बाळासाहेब मुरुमकर, प्रभाकर काळे सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागिय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले. यामध्ये महाराजस्व अभियानाबाबत माहिती दिली. सर्व विभाग एकाच छताखाली आणून एकाच दिवशी नागरिकांची कामे करण्याचा उद्देश असल्याचेही सोगितले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय संलग्नीत रक्तदाता संघाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. होते यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक प्रमोद पोतदार, जितेेंद्र शेटीये, सचिव चरण सोनारे, पंकज केचे यांचा पालकमंत्री पोटे, आ. बोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रक्तदाता संघाबाबत माहिती संजय खासबागे यांनी दिली. महाराजस्व अभियानादरम्यान नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Response to Lord Shiva's campaign at Worood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.