पुनर्जीवन शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:20 AM2018-04-13T01:20:06+5:302018-04-13T01:20:06+5:30

शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, .....

Restore Resurrection Surgery Center | पुनर्जीवन शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करा

पुनर्जीवन शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करा

Next
ठळक मुद्देशंकरबाबा पापळकर : जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह ५० जणांचा अवयवदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, अशी मागणी अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी केली. पुनर्जीवन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सामूहिक अवयवदान संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जाकीर, सुरेश ठाकरे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश उभाड, गांधारी पापळकर, संध्या वैद्य, शोभा मुघलसह डॉ. संदीप चौधरी, जितेंद्र रोडे, श्रीराम कुलकर्णी, राजा पिंजरकर, विनोद नागे, प्रमोद डेरे, सुदर्शन काळे आदी उपस्थित होते.
माझ्या १२३ गतिमंद अंध अपंग मुलांच्या वेदना मला माहीत आहेत. आपण जिजाऊ बिग्रेडच्या महिलांनी अवयवदानाचा घेतलेला संकल्प देशाला प्रेरणादायी आणि मृत्यूनंतरही इतरांना जीवन देणारा आहे, असे शंकरबाबा पापळकर पुढे म्हणाले. अवयवदानाचे महत्त्व समजावून घेत आपण केलेला संकल्प खरोखरच महान आहे. परतवाडा येथे अवयवदान केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व मान्यवरांनी विशद केले.
संभाजी ब्रिगेडच्या महिलांनी अवयवदानाचा संकल्प करीत समाजापुढे एक आदर्श ठेवला. यामध्ये उज्ज्वला प्रवीण बेलसरे, वृषाली प्रवीण भिंगारे, अलका राजेंद्र बोंडे, सुवर्णा सचिन चतुर, कल्पना प्रभाकर चौधरी, मीनाक्षी विनोद दळवी, नर्मदा जानराव दळवी, रेणुका शरद दसरे, सरिता महेश गाडगे, प्रिया सचिन गवई, हर्षदा राजेश इंगळे, कल्पना लक्ष्मण इंगळे, अंजली अशोक जवंजाळ, मंदा दादाराव जवंजाळ, मनीषा राहुल कडू, सुशीला अंबादास कडू, रूपाली दिनेश कळसकर, स्वाती शैलेश कांडलकर, स्वप्ना प्रवीण खेरडे, मोनाली नितीन मानकर, लक्ष्मी जगदीश पानसे, वैशाली राजेश पातोंड, लीनता अजय पवार, विजया राजेश फाटकर, भारती अमोल राऊत, अपर्णा जितेंद्र रोडे, किरण वडुरकर, संध्या बाबासाहेब वैद्य, दीपाली मनीष विधळे, सचिन चतुर, भगवंत गावंडे, अशोक जवंजाळ, दिनेश कळसकर, प्रवीण काळे, जगदीश पानसे, गौरव पारवे, अजय पवार, अमोल राऊत, नीलेश मनीष विधळे, गौरव राठी आदींचा समावेश आहे. या सोहळ्याला नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.

परतवाड्यात पुनर्जीवन फाउंडेशनच्या मदतीने एकाच दिवशी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह तब्बल ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करणे ऐतिहासिक आहे. फाऊंडेशनचे कार्य अविरत सुरू राहील.
- डॉ राजेश उभाड,
अध्यक्ष पुनर्जीवन फाउंडेशन

Web Title: Restore Resurrection Surgery Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.