सहा दिवसात 75 अभ्यासक्रमांचे निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 10:19 PM2020-11-08T22:19:10+5:302020-11-08T22:20:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सहा दिवसांत ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहे. रविवारी सुटीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सहा दिवसांत ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी २६ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, १२ नोव्हेंबरपर्यंत एकूणच अभ्यासक्रमांचे निकाल लागतील, अशी तयारी करण्यात आली आहे.
२६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा आटोपल्या. ३ नोव्हेंबरपासून विद्यापीठाने निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाविद्यालयातून पाठविण्यात आलेल्या गुणांच्या आधारे विद्यापीठ निकाल जाहीर करीत आहे. त्यानुसार सहा दिवसांत ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले. रविवारी अभियांत्रिकीच्या सत्र- ८ चे एकूणच निकाल जाहीर करून गुणपत्रिका महाविद्यालयांत पाठविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दोन दिवसांत जाहीर झालेले निकाल
शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. यात पेट्रोकेमिकल, ऑईल ॲन्ड पेंट, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर, आयटी, ई.ई, सीएसई, मेकॅनिकल, ईएक्सटीसी, बायोमेडिकल, सिव्हिल, कम्प्यूटर इंजिनीअरिंग तसेच अभियांत्रिकी शाखेत सत्र-८ मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिकन्स अँड टेलिकम्युनिकेशन, बी. व्होक सत्र-२, सत्र-४, एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी सत्र-३ व सत्र-१, एम.ए. भाग-२ पाली व प्राकृत, बीपीए सत्र-४, एमसीएम सत्र-३, एमएचआरडी सत्र-२, पीजीओ कौन्सेलिंग ॲन्ड पीएसवाय थेरेपी सत्र-१ व सत्र-२, एम.ए. पीजीओ कौन्सेलिंग ॲन्ड पीएसवाय थेरेपी सत्र -१व सत्र -२, एम.ए. भाग-२ म्यूझिक, भूगोल, बीपीए सत्र-५, एमएस्सी एचएससी सत्र-४ (एफएसएन, एचडी), एमपीएड सत्र-१, सत्र-२, सत्र-३ व सत्र- ४ (सीजीएस) या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.
निकाल जाहीर करताना आयसीआर प्रणालीवर ताण वाढला आहे, काही महाविद्यालयांनी अंतर्गत व सत्र गुण पाठविण्यास विलंब लावला. त्यामुळे निर्धारित वेळेत निकाल जाहीर करता येत नाही.
- हेमंत देशमुख
संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.