आमीर खान विरोधातील तक्रारींचा सोमवारी निकाल
By admin | Published: December 6, 2015 12:07 AM2015-12-06T00:07:30+5:302015-12-06T00:07:30+5:30
अभिनेता आमीर खान यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवार ७ डिसेंबरला निकाल येण्याची शक्यता आहे.
अमरावती : अभिनेता आमीर खान यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवार ७ डिसेंबरला निकाल येण्याची शक्यता आहे. याप्रकरणात शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी एच.आर. वानखडे यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. आमीर खानविरोधात होणाऱ्या कारवाईची दिशा या निकालानंतर निश्चित होणार आहे.
एका टीव्ही शोमध्ये भारतात अराजकता व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याचा आरोप करुन अमीरविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी हिंदू हुंकार संघटनेने २५ नोव्हेंबर रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीतून केली. मात्र, शहर कोतवाली पोलिसांनी ती तक्रार चौकशीमध्ये ठेवली. कुठलेही गुन्हे दाखल केले नाहीत.
त्या पार्श्वभुमीवर हिन्दूं हुंकार संघटनेचे सुधिर बोपुलकर यांनी स्थानिक न्यायालयात धाव घेतली. फौजदारी संहिता अतंर्गत कलम १५६ (३) खाली न्यायालयात तक्रार अर्ज सादर करून अमिर खान विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी याचीकेतून केली. याचीकाकर्त्यांतर्फे अभियोक्ता प्रद्युम्न भिरंगी, सुनील मिश्रा, सागर इसरानी, निलेश जोशी, दत्तात्रय गाडगे, विशाल गणोस्कर, प्रशांत गणोरकर, प्राजक्त गाडगे यांनी न्यायालयात बाजू मांडली.