तिवसा तालुकास्तरीय खुली निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:20+5:302021-04-16T04:12:20+5:30

स्पर्धेतील विषय शहीद भगतसिंग यांचे विचार आणि आजचा युवक व परिस्थिती, शहीद भगतसिंग यांचे विचार आणि आजचा शेतकरी व ...

Results of Tivasa taluka level open essay competition announced | तिवसा तालुकास्तरीय खुली निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

तिवसा तालुकास्तरीय खुली निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Next

स्पर्धेतील विषय शहीद भगतसिंग यांचे विचार आणि आजचा युवक व परिस्थिती, शहीद भगतसिंग यांचे विचार आणि आजचा शेतकरी व परिस्थिती हे होते. बक्षीस वितरण 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्याचे ठरवले होते. परंतु लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. अखेर १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोजक्या स्पर्धकांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचे निर्बंध यामुळे सर्व स्पर्धकांना या कार्यक्रमाला निमंत्रित करता आले नाही. निकाल परीक्षक पुंडलिक पापणकर यांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक अभिषेक दिनेश सावरकर (मोझरी) याला मिळाला. त्याबद्दल त्याला खलील शहातर्फे १००० रुपये रोख प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक प्रतीक संजयराव रिठे (पालवाडी) यांना सुरेंद्र भिवगडे (सरपंच मोझरी) यांच्यातर्फे ७०० रुपये देण्यात आले. तृतीय क्रमांक राखी विनोदराव (पोहेकर) मोझरी हिला वैभव कांडलकर मोझरीतर्फे ५०० रुपये रोख प्रदान करण्यात आले. ब गटात प्रथम क्रमांक सविता ज्ञानेश्वरराव शेंदरे, गुरुदेवनगर

योगेश ढवळेतर्फे १००० रोख, द्वितीय क्रमांक वैष्णवी रा. काजळकर (तिवसा) वैशाली सुनील राऊत, यांच्यातर्फे ७०० रुपये रोख, तृतीय क्रमांक शीतल महेश दहिकर (मोझरी)

रोशन लक्ष्मणराव कांडलकर यांच्यातर्फे ५०० रुपये रोख, तर प्रोत्साहनपर बक्षीस सायली विनोदराव डेहनकर, युगा सुधीर सोमवंशी, कांचन अनिल कोकणे यांना प्रत्येकी ३०० रुपये रोख, कल्याणी कैलासराव कातोरे, वैष्णवी राजेंद्र बारई, गायत्री प्रदीप गांधी यांना पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पुंडलिक पापणकर, भूवैकुंठ अध्यात्म गुरुकुलचे सचिव रवि मानव, मोझरीचे सरपंच सुरेंद्र भिवगडे, संघटनेचे अमोल वडसकर, गोकुल राहाटे, लेशपाल चोपकर, अजीम पठाण, आशिष पाचघरे, शफीक शहा, अंकुश वाघ, अभिजित भेलकर, दिनेश खराटे, रोशन कांडलकर उपस्थित होते.

Web Title: Results of Tivasa taluka level open essay competition announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.