निवृत्त कर्मचाऱ्यांची जिल्हाकचेरीवर धडक
By admin | Published: June 29, 2017 12:30 AM2017-06-29T00:30:53+5:302017-06-29T00:30:53+5:30
राज्य परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी ई.पी.एस-९५ पेंशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
आंदोलन : अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी ई.पी.एस-९५ पेंशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना,व ई.पी.एस-९५ समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
राज्य परिवहन विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ई.पीएस ९५ पेंशनधारकांना कमीत कमी तीन हजार पेंशन देण्यात यावी,व त्यास केंद्र सरकारच्या महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता असे मिळून पेंशन देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर.एम.जाधव,अनिल पेंढारी, दिवाकर खोरगडे,आदीसह शेकडो सेवानिवृत्त पेंशन धारक सहभागी झाले होते.