अपंगांना पुढे करून भीक मागणारे परतवाडा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:12 AM2021-03-06T04:12:27+5:302021-03-06T04:12:27+5:30

नागरिकांच्या सतर्कमुळे पटली बेपत्ता वृद्धाची ओळख, चिखलदरा स्टॉपवरील घटना अनिल कडू परतवाडा : बेपत्ता अंध-अपंग व्यक्तींना पुढे करून त्यांच्या ...

Returning beggars in the custody of the police | अपंगांना पुढे करून भीक मागणारे परतवाडा पोलिसांच्या ताब्यात

अपंगांना पुढे करून भीक मागणारे परतवाडा पोलिसांच्या ताब्यात

Next

नागरिकांच्या सतर्कमुळे पटली बेपत्ता वृद्धाची ओळख, चिखलदरा स्टॉपवरील घटना

अनिल कडू

परतवाडा : बेपत्ता अंध-अपंग व्यक्तींना पुढे करून त्यांच्या मदतीने भीक मागणाऱ्या मालेगावच्या दोन युवकांना त्या अपंगांसह नागरिकांनी परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. यात दीड वर्षांपासून शहरातून बेपत्ता झालेल्या वृद्धाची ओळख पटली आहे.

धारणीला ३ मार्चला सकाळी जाणारी टपाल एसटी बस परतवाड्यातील चिखलदरा स्टॉपवर थांबली. ६० ते ६५ वर्षीय दोन वृद्ध २२ ते २४ वर्षीय दोन युवकांसमवेत व्हील चेअरवर प्रवास करीत होते. यातील एक वृद्धाने पाय, तर अन्य वृद्धाने डोळे गमावले होते. परतवाडा येथील इसमाने त्यातील एका वृद्धाला ओळखले. मुगलाईतील सदर अंध वृद्ध दीड वर्षांपासून शहरातून बेपत्ता होता. लागलीच त्याने ही बाब त्या स्टॉपवरील उपस्थितांना सांगितली. टपालपुरावासीयांनी वृद्धांसह त्या युवकांना बसच्या खाली उतरवले आणि त्या चौघांनाही परतवाडा पोलीस ठाण्यात पोहचवले. मुगालाईतील दीड वर्षांपासून बेपत्ता अंध वृद्धाची ओळख पटली. त्याला अखेर नातेवाइकांच्या स्वाधीन केले. पण, पाय नसलेल्या वृद्धासह त्या दोन युवकांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड मागविण्यात आले आहे.

अंध-अपंग वृद्धांना गावोगावी फिरवून हे युवक भीक मागण्याचा व्यवसाय करतात. मुगलाईतील वृद्ध वगळता उर्वरित तिघेही मालेगावचे निवासी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यादरम्यान त्या युवकांनी या वृ्द्धांकडून परतवाड्यापासून नांदेडपर्यंत भीक गोळा केल्याची माहिती आहे. ज्या भागात जातील, त्या भागात ते काही दिवस थांबतात. भीक मागण्याचा व्यवसाय त्या वृद्धांकरवी करवून घेतात आणि परत पुढच्या गावाच्या दिशेने ते प्रवासास निघतात. बाजारातही ते फिरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Returning beggars in the custody of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.