‘स्पॉट फाईन’मधून १० लाखांचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:20 PM2018-03-18T22:20:51+5:302018-03-18T22:20:51+5:30
स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत ओडी स्पॉट ( हागणदारीच्या जागा ) आणि प्लास्टिकबंदीच्या कारवाईतून महापालिकेने ९ लाख ६८ हजार ३०० रुपयांची दंडवसूली केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत ओडी स्पॉट ( हागणदारीच्या जागा ) आणि प्लास्टिकबंदीच्या कारवाईतून महापालिकेने ९ लाख ६८ हजार ३०० रुपयांची दंडवसूली केली आहे. आॅक्टोबर २०१७ ते १५ मार्चपर्यतचा हा लेखाजोखा असून आता नव्याने प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमिवर ‘स्पॉट फाइन’ची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ५६६ प्रकरणात ही दंडवसूली करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम यांनी दिली.
प्लास्टिक पिशव्यांच्या बेसुमार वापरावर प्रतिबंध घालून त्यातील ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पन्नी वापरणारे तथा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी अजय जाधव यांच्यासह स्वास्थ्य व जेष्ट स्वास्थ्य निरिक्षकांचे पथक कार्यान्वित करण्यात आले. त्यासंदर्भात ११ एप्रिल २०१७ रोजी आयुक्त हेमंत पवार यांनी आदेश काढला. सिस्टिम मॅनेजरने ‘बॅन प्लास्टिक’ नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप बनवावा, त्यात समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचाºयांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैलीचा वापर होत आढळल्यास ती तक्रार ग्रुपवर पोस्ट करावी. जेष्ट स्वास्थ निरिक्षकांनी संबंधित व्यावसायिकांवर दंड व फौजदारी कारवाई करावी , असे ते आदेश होते. कारवाई करताना संबंधित व्यावसायिकांकडून प्रथम गुन्ह्याकरीता ५ हजार रुपये, द्वितीय गुन्ह्याकरीता १० हजार,े तर तिसºया गुन्ह्याकरीता २५ हजार रुपये दंड आकारणी करावी, दंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाईचे निर्देश होते. त्याप्रमाणे जाधव व त्यांच्या पथकाने मुख्यत्वे बाजारपेठांवर लक्ष केंद्रीत केले. स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम गुणांकन मिळविण्यासाठीही प्लास्टिक विरोधी मोहिम राबविण्यात आली. आता नव्याने गुढीपाडव्यापासून संपुर्ण प्लास्टिकबंदी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमिवर शासनादेश आल्यानंतर धडक मोहिम राबविण्यात येणार आहे.
ओडी स्पॉटवरूनही दंडवसुली
शहरातील ज्या जागांवर नागरिक उघड्यावर शौचास जात होते.ती ठिकाणे स्वच्छ करुन हागणदारी मुक्त घोषित करण्यात आली. मात्र बऱ्यांच प्रयत्नानंतर ज्या जागा हागणदारीमुक्त होऊ शकल्या नाहीत. अशा ११ जागा ओडी स्पॉट म्हणून घोषित करण्यात आल्या.त्या ओडी स्पॉटसह उघड्यावर जाणाºया व्यक्तींकडूनही या मोहिमेदरम्यान दंडवसूली करण्यात आली.