धारणीतील रेती तस्करांना महसूलचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:57+5:302021-05-03T04:07:57+5:30
पान २ ची लिड घोळ उघड, वाहतुकीचे नियम न पाळल्यास कारवाई पंकज लायदे धारणी : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गौण खनिजाची ...
पान २ ची लिड
घोळ उघड, वाहतुकीचे नियम न पाळल्यास कारवाई
पंकज लायदे
धारणी : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गौण खनिजाची वाहतूक करताना मध्यप्रदेश सरकारकडून प्राप्त केलेल्या रॉयल्टीत वाहतुकीचे अंतर व वेळेत प्रचंड घोळ घालून एका रॉयल्टीवर दिवसभरात तीन ते चार ट्रिप अवैधरीत्या रेती वाहतूक सुरू होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. त्यावर वाहतुकीचे नियम ठरवून देणारी जाहीर नोटीस तहसीलदारांनी काढली आहे.
धारणीपासून १८ किलोमीटर अंतरावर आंतरराज्यीय सीमा आहे. त्याअनुषंगाने मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गौन खनिज वाहतूक करताना महाखनिज पोर्टलवर नोंदणी करून गौण खनिजांची वाहतून करणे अनिवार्य आहे. त्यानुसारच महाराष्ट्रात रेती वाहतूक करता येते. त्याच्या आधारावर धारणीतील काही रेती तस्करांनी मध्यप्रदेशातील बोगस रॉयल्टीआधारे धारणी तालुक्यात रेती वाहतूक सुरू केली. पण मध्यप्रदेशातील रॉयल्टीत वाहतुकीचे अंतर व वेळेत घोळ निर्माण करून रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. यासह मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात यायचे असेल तर कोविड तपासणी करूनच यावे लागते, त्याची भोकरबर्डी येथील वनविभागाच्या नाक्यावर नोंद करणे गरजेचे आहे. त्यातही काही रेती तस्करांनी वनविभागाचे नाके मॅनेज केले. त्याबाबत वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली. त्यानुसार धारणीचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी रेती तस्करी रोखण्याकरिता जाहीर नोटीस काढली आहे.
बॉक्स
रॉयल्टीतील वेळ, अंतरात होता घोळ
मध्यप्रदेशातील रत्नापूर, देशघाट, मेलचुका, तुकइथड, देडतलाई धारणी हे अंतर २५ किलोमीटर आहे. आणि हे अंतर गाठण्याकरिता वाहनाला फक्त एक तासाचा कालावधी लागतो. परंतु, मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर रत्नापूर ते अमरावती धारणी हे अंतर १५८ ते १६० किलोमीटरचे आहे. ते गाठण्याकरिता आठ तासांचा कालावधी लागतो. असा घोळ करून धारणीतील रेती तस्कर वनविभागाचे नाके मॅनेज करून व महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रेती वाहतूक करीत होते. याकडे प्रसार माध्यमांनी लक्ष दिल्यानंतरच तहसीलदारांनी रेती वाहतुकीवर निर्बंध लावण्याकरिता जाहीर नोटीस काढली आहे.
बॉक्स
कव्हर देत करत होते रेती वाहतूक
धारणीतील रेती तस्कर मध्यप्रदेशातून रेती वाहतूक करताना वाहन कुणी अडवू नये, म्हणून समोर स्वत:चे चारचाकी वाहन त्यामागे रेती वाहतुकीचे तीन ते चार टिप्पर, आणखी त्यामागे रेती तस्कराच्या नातेवाईकांचे चारचाकी वाहन, असे रेतीच्या वाहनांना कव्हर देणे रेती वाहतूक तस्करांकडून सुरू होते. नाक्यावर ट्रॅक्टरचालक वाहन हे रॉयल्टी व कोरोना चाचणीचा अहवाल स्वत: दाखवत नव्हते तर रेती तस्कर त्यांनी मॅनेज केलेल्या वनविभागाच्या नाक्यावर दाखवत होते. तेथे उपस्थित कर्मचारी ‘ऑल इज वेल’चा संदेश देत वाहन सोडून देत होते.
बाईट
रेती वाहतूक करताना रॉयल्टीची तपासणी केली असता त्यावर वाहतुकीच्या अंतरात व वेळेत घोळ आढळून आला. ती रेती वाहतूक अवैध असल्याचे दिसून आल्याने वाहतूकदारांकरिता जाहीर नोटीस काढण्यात आली. त्याप्रमाणे वाहतूक न झाल्यास यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.
- अतुल पाटोळे,
तहसीलदार, धारणी
----------------