लाचखोरीत महसूल विभाग अव्वल स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 06:00 AM2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:44+5:30

महसूल व भूमिअभिलेख विभागात लाचखोरीची १६४ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ३१ लाख २३ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी १५७ प्रकरणात अडकले. त्यांच्या एकूण लाचखोरीची रक्कम महसूलपेक्षा अधिक असली तरी एकूण सापळे व अटक आरोपींमध्ये महसूल विभागच अव्वल आहे.

Revenue department ranks top in bribery | लाचखोरीत महसूल विभाग अव्वल स्थानी

लाचखोरीत महसूल विभाग अव्वल स्थानी

Next
ठळक मुद्दे१६४ ट्रॅप : २२३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक, १ कोटी ५९ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथ

प्रदीप भाकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लाचखोरीच्या प्रकरणात राज्यात महसूल विभाग अव्वल स्थानी असून, पोलीस विभाग दुसºया क्रमांकावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईतून ही बाब समोर आली आहे. दहा महिन्यांत राज्यभरात लाचखोरीची ७२८ प्रकरणे समोर आली आहेत. १००७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात महसूल विभागाच्या १६४ प्रकरणांमध्ये सर्वाधिक २२३ जणांना अटक करण्यात आली, तर पोलीस विभागातील १५७ लाच प्रकरणांमध्ये २१७ आरोपी अडकले. लाचेत महसूल विभाग अव्वल, तर पोलीस विभागात दुसºया क्रमांकावर आहे.
राज्यात जानेवारी २०१९ ते २२ १६४ ट्रॅप : २२३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक, १ कोटी ५९ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथक्टोबरमध्ये ७२८ लाचखोरीची प्रकरणे समोर आली. त्यात लाचेचे ७०६, अपसंपदाची १८ व अन्य भ्रष्टाचाराच्या चार प्रकरणांचा समावेश आहे. पोलीस, महावितरण, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, वनविभाग, पशुसंवर्धन, अन्न व नागरी पुरवठा, जलसंपदा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य उत्पादन विभाग, आदिवासी विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, विक्रकर विभाग, विधी व न्याय विभाग, उद्योग व ऊर्जा विभाग, समाजकल्याण, नगररचना, वित्त, सहकार व पणन , शिक्षण, क्रीडा, अन्न व औषध प्रशासन, कृषी, राज्य परिवहन, सिडको, महिला व बाल विकास, महात्मा फुले मागासवर्गीय, म्हाडा, महाराष्टÑ औद्योगिक विकास मंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेस्ट, वजन व मापे विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, बंदर व कारागृह अशा एकूण ४० विभागांतील ९५८ अधिकारी कर्मचारी व खासगी व्यक्तींना लाचखोरीत पकडण्यात आले. या ४० विभागांत ७०६ ट्रॅप यशस्वी करण्यात आले. त्यात वर्ग १ चे ४७, वर्ग २ चे ८०, वर्ग ३ चे ५७२, वर्ग ४ चे ४४ व १५४ खासगी व्यक्तींना १ कोटी ५९ लाख ३७ हजार ९३५ रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. यात महसूल व भूमिअभिलेख विभागात लाचखोरीची १६४ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ३१ लाख २३ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी १५७ प्रकरणात अडकले. त्यांच्या एकूण लाचखोरीची रक्कम महसूलपेक्षा अधिक असली तरी एकूण सापळे व अटक आरोपींमध्ये महसूल विभागच अव्वल आहे. जानेवारी ते २२ १६४ ट्रॅप : २२३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक, १ कोटी ५९ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथक्टोबर या कालावधीत १८ अपसंपदांच्या प्रकरणामध्ये ३९, तर भ्रष्टाचाराच्या अन्य चार प्रकरणांत १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्थाही लाचखोरीत
दोन वर्षांतील लाचखोरीच्या प्रकरणांचा आढावा घेतला, तर जिल्हा परिषद, महानगरपालिका, महावितरण, वनविभाग, पंचायत समिती विभागांविरोधातील लाचखोरीच्या प्रकरणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. एकूणच शासकीय कार्यालयांतील लाचखोरी रोखण्यासाठी व्यापक कारवाई होत असली तरी लाचखोरीचे प्रमाण कमी होत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ मध्ये केलेली कारवाई
लाचखोरीच्या प्रकरणांत सर्वाधिक सापळे पुणे विभागात लावण्यात आले. मुंबई विभागात ३१ सापळे यशस्वी करण्यात आले. त्यात ४४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे विभागात ७५ सापळ्यांमध्ये १०७, पुणे विभागात सर्वाधिक १४६ प्रकरणांमध्ये २००, नाशिक विभागात ९८ प्रकरणात १३०, नागपूर विभागात ८३ सापळ्यांमध्ये १०७, अमरावती विभागात ९६ प्रकरणांमध्ये १३३, औरंगाबादमध्ये १०८ प्रकरणात १४२ व नांदेड विभागात ६९ प्रकरणांमध्ये ९५ आरोपी निष्पन्न झाले.

Web Title: Revenue department ranks top in bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.