तेजुसिंग पवार यांच्याविरुद्ध महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार
By Admin | Published: June 28, 2014 12:20 AM2014-06-28T00:20:14+5:302014-06-28T00:20:14+5:30
जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यानंतर जबाबदार असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्या मनमानी कारभाराविरोधात...
अमरावती : जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यानंतर जबाबदार असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या व संवर्गाची पदस्थापना देताना केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अर्धा दिवस रजा आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते.
पश्चात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची सकारात्मक चर्चा झाली. प्रत्यक्षात अव्वल कारकून संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदस्थापना देताना तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या, पुरवठा निरीक्षक, करमणूक कर निरीक्षकांच्या बदल्यांमुळे अन्याय झाल्याचा संघटनेचा आरोप आहे. आपसी तसेच विनंती बदल्या करताना पक्षपात करून निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे.