जिल्ह्यातील महसुली कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:20 PM2017-10-10T23:20:41+5:302017-10-10T23:21:00+5:30

अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरल्यास महसूलच्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. पदे पदानवत होण्याची भीती आहे.

Revenue operation jam in the district | जिल्ह्यातील महसुली कामकाज ठप्प

जिल्ह्यातील महसुली कामकाज ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचाºयांचे कामबंद : शासनस्तरावर अनेक मागण्या प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरल्यास महसूलच्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. पदे पदानवत होण्याची भीती आहे. तसेच पुरवठा आस्थापनावरील कर्मचाºयांना अनेक अडचणी येत आहेत. शासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याचे निषेधार्थ महसूल संघटनांद्वारा १० आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महसुली कामकाज खोळंबले
महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक करण्याचे मान्य केले. त्यानुसार शासन निर्णय पारित करावा, नायब तहसीलदार पदाच्या वाढीव ग्रेड पेचा निर्णय घ्यावा, अव्वल कारकून संवर्गाच्या वेतनश्रेणीमधील त्रुटी दूर करावी. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याचा निर्णय पारित करण्यात यावा. पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरण्यात यावीत यासह आदीबाबत मागील ती तीन ते चार वर्षांत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल संघटनांद्वारा कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव गडलिंग यांनी सांगितले.
विभागीय आयक्त कार्यालयात सुधीर धावडे, राजीव वानखडे, सुजान सोळंके, राजेश चौधरी, शरद लोणारे, विजय सूर्यवंशी, रवींद्र काळे, गोकुल निशाद, सय्यद वशीम, संध्या ठाकरे, सिमा ठाकरे, शुभांगी साकळे, अर्चना निपाणे, अमोल भड, संतोश नटवे आदींचा सहभाग होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात नकूल आळे, महेंद्रसिंग ठाकूर, योगेश रेवस्कर, विनोद भगत, पुरुषोत्तम उकर्डे, गजानन उगले, मुकेश देशमुख, दीपक शिरसाट, ब्रिजेश वस्ताणी, अंबादास काकडे, अमर वानखडे, विनायक लंगडे, विवेक ओकोलकर, पी.एम.बढीये, माशुरी सगणे, ज्योती गणोरकर, बी.आर. जिचकार, डी.एस.महल्ले, व्ही.बी राठोड, व्ही.एम.नाकाडे, एस.जी रत्नपारखी आदींचा सहभाग होता.

Web Title: Revenue operation jam in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.