पंचायत समितीनिहाय प्रशासकीय कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:13 AM2021-05-13T04:13:45+5:302021-05-13T04:13:45+5:30

अमरावती : जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचा विविध विषयनिहाय विस्तृत आढावा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्हिडिओ ...

Review of administrative work by Panchayat Samiti | पंचायत समितीनिहाय प्रशासकीय कामांचा आढावा

पंचायत समितीनिहाय प्रशासकीय कामांचा आढावा

Next

अमरावती : जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचा विविध विषयनिहाय विस्तृत आढावा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू केला आहे. मंगळवारपासून चिखलदरा पंचायत समितीचा आढावा गटविकास अधिकारी (बीडीओ) कडून घेतला आहे. याशिवाय अन्य पंचायत समितीचाही प्रत्येक दिवशी आढावा घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदभार स्वीकारताच प्रत्येक तालुक्याचा विस्तृत आढावासोबतच संबंधित तालुक्याची माहिती तसेच जिल्हा परिषद व शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना, विकासकामे याबाबत काय स्थिती आहे, याचा लेखाजोखा जाणून घेतला जात आहे. यात प्रामुख्याने महाआवास योजना, पाणीटंचाई, नरेगा अंतर्गत कामांचा आढावा, जलजीवन मिशन, कुपोषण, बालमृत्यूबाबत आढावा, खरीप पेरणीबाबत आढावा, तालुक्यातील बांधकामविषयक कामे, कोविड १९ अंतर्गत तालुकानिहाय स्थिती व उपाययोजना आदी विषयांबाबत मुख्य कार्यकारी अधिकार पंचायत समितीनिहाय आढावा घेत आहेत. यावेळी संबंधित गटविकास अधिकारी यांना महत्त्वाच्या सूचनाही मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडून केल्या जात आहेत.

Web Title: Review of administrative work by Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.