चिखलदरा पर्यटन महोत्सवासाठी आढावा बैठक

By admin | Published: January 25, 2016 12:31 AM2016-01-25T00:31:10+5:302016-01-25T00:31:10+5:30

मेळघाटातील पर्यटन वाढीसाठी येत्या ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास ...

Review meeting for Chikhaldara tourism festival | चिखलदरा पर्यटन महोत्सवासाठी आढावा बैठक

चिखलदरा पर्यटन महोत्सवासाठी आढावा बैठक

Next

पूर्वतयारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक उपस्थित राहणार, नृत्य, संगीताची मेजवानी
अमरावती : मेळघाटातील पर्यटन वाढीसाठी येत्या ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, चिखलदरा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथील पोलीस कवायत मैदानावर चिखलदरा पर्यटन महोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमत्ती दिली आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे, वन व पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खासदार, स्थानिक व सर्व आमदार, पर्यटन सचिव, पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.
बैठकीला नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, उपनगराध्यक्ष रेशमा परवीन शेख महेबूब, नगरसेवक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नेवस्कर, उपविभागीय अधिकारी राठोड, विभागीय वन अधिकारी वानखडे, युवराज, मुख्यधिकारी सुमेध अलोने, उपअभियंता आशुतोष शिरभाते, प्रभारी तहसीलदार एन.डी.बेंडे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, हॉटेल ओनर्स संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी परदेशी म्हणाले की, महोत्सव काळात रंगारंग कार्यक्रमाची धमाल राहणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी रांगोळी रेखाटन व पतंग बाजी, उद्घाटन समारोह, विविध साहसी उपक्रम, पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लायडींग, पदभ्रमण, घोडा व उंट सफारी, गाविलगड किल्ल्यात लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो, रात्री ७ ते १० पर्यंत रंगवेध हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिला आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी विविध साहसी प्रकारासह दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरद्वारा सुरेखा पुणेकरद्वार प्रस्तुत नटरंगी नार ही लावणी तसेच ७ फेब्रुवारीला मेळघाट मॅराथॉन स्पर्धा, सकाळी विविध सहासी उपक्रम, 'चला हवा येऊ द्या फेम'चे कलाकार भरत गणेशपुरे व सागर करंडेद्वारा प्रस्तुत हलकं फुलकं हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. ८ फेब्रुवारी रोजी हिंदी मराठी हास्य कवी संमेलन होणार आहे.
चिखलदरावासीयांच्या दृष्टीने हा भाग्याचा क्षण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा नियोजन समितीकडूुन आठवडाभरात निधी मिळणार आहे. सिडको व एमआयडीसी संघटनांचा ही यात सहभाग मिळणार आहे. सुमारे ३० ते ३५ स्टॉल उभारण्याचे नियोजन आहे. याबाबत विविध विषयावरसुध्दा चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Review meeting for Chikhaldara tourism festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.