धारणी येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेची आढावा सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:48+5:302021-09-12T04:15:48+5:30
कास्ट्राईब शिक्षक संघटनेची आढावा सभा तालुकाध्यक्ष अनिल तायडे यांचे निवासस्थानी झाली. या सभेमध्ये शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करणे, कोणाचेही सेवापुस्तक ...
कास्ट्राईब शिक्षक संघटनेची आढावा सभा तालुकाध्यक्ष अनिल तायडे यांचे निवासस्थानी झाली. या सभेमध्ये शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करणे, कोणाचेही सेवापुस्तक गहाळ होणार नाही याची दक्षता घेणे, कोरोना कालावधीत व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार शिक्षक उपस्थिती ठेवणे, नियमानुसार अर्जित रजा मंजूर करून वेतन काढणे, वैद्यकीय रजा आणि प्रशासकीय बदली झालेल्या शिक्षकांचे प्रवास देयके काढणे, जीपीएफ स्लिप सर्वांना कार्यालयामार्फत देणे, डीसीपीएसधारक सर्व शिक्षक आणि चटोपाध्याय प्रकरणे निकाली काढणे, दरमहा वेतन ५ तारखेच्या आत करणे, कार्यालयात सर्व शिक्षक यांना सन्मानाची वागणूक देणे आदी विषयांवर चर्चा होऊन पुढील आठवड्यात गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, सभापती आणि आमदार यांना निवेदन देण्याचे ठरले.
आढावा सभेला तालुकाध्यक्ष अनिल तायडे, सरचिटणीस ललित कांबळेसह सुखलाल भिलावेकर, हेमंतकुमार मोहोड, कैलास नरव्हास, मनीष धांडे, अनिल मोहोड, विजय सगळे, गुळदे, ढाकरे, सीमा भुजाडे, कीर्ती कांबळे, भावना पैठणकर, सरिता भावे, दीपाली मनवर, वैशाली मोहोड, अलका इंगळे, कल्पना मंडे, प्रांजली अहमदाबादे, ढोके, हरले, पवन इंगळे उपस्थित होते.