पालकमंत्र्यांकडून नगरपंचायतीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:28+5:302021-08-01T04:13:28+5:30

अनागोंदी कारभारावर नाराजी : मुख्याधिकाऱ्यांना फटकारले (फाेटो आहेत) तिवसा : नगरपंचायत कार्यालयावर सध्या प्रशासक बसले आहेत. त्यामुळे येथील कारभार ...

Review of Nagar Panchayat by the Guardian Minister | पालकमंत्र्यांकडून नगरपंचायतीचा आढावा

पालकमंत्र्यांकडून नगरपंचायतीचा आढावा

googlenewsNext

अनागोंदी कारभारावर नाराजी : मुख्याधिकाऱ्यांना फटकारले (फाेटो आहेत)

तिवसा : नगरपंचायत कार्यालयावर सध्या प्रशासक बसले आहेत. त्यामुळे येथील कारभार पार ढेपाळला असल्याने शनिवारी नगरपंचायत कार्यालयात सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठकीत येथील कारभारावर नाराजी व्यक्त केली.

मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना चांगलेच फटकारले. शहरात विविध समस्या असल्याने त्या निकाली निघत नाही. गढूळ पाणीपुरवठा होतो. त्यावर उपाययोजना का करत नाही, असा संतप्त सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित करीत सुरुवातीलाच कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या विकासकामाचे भूमिपूजन का घेतले नाही. सदर काम संरक्षण भिंतीचे असून, ७२ लाखांचे आहे. मी कामासाठी पैसे दिले. त्यामुळे मला का विचारले नाही, असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केला. अधीक्षक संजय संतोषवार व येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फटकारत तुम्ही राजकारण करता येथील बाहेरील माहिती का बाहेर जाते? त्यामुळे अधीक्षक संतोषवार यांना तत्काळ निलंबित करा, असा आदेश पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्याधिकारी सोटे यांना दिले. तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने शहरात स्वच्छताच नाही त्यामुळे स्वच्छता का नाही, असा सवाल उपस्थित केला. येथे पूर्णपणे वाऱ्यावर कारभार चालत असल्याने येथील कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. एकंदरीतच या संपूर्ण आढावा बैठकीत यशोमती ठाकूर येथील कारभारावर संताप व्यक्त केला. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार वैभव फरतारे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने उपस्थित होते.

--------------

बॉक्स

तिवसा शहरात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पालकमंत्री ठाकूर यांच्यासमोर महिलांनी व्यथा मांडली. कोट्यवधींचा निधी नगरपंचायतीला आहे. त्यामुळे पहिले पाण्याला प्राधान्य द्या, असा दम यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिला.

Web Title: Review of Nagar Panchayat by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.