महाराजस्व अभियानाच्या तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:46 PM2019-01-07T22:46:37+5:302019-01-07T22:46:56+5:30
जनसामान्यांच्या अडचणी सोडविणे व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरीय महाराजस्व अभियान १३ जानेवारीला सायन्सकोर मैदानावर होणार आहे. अभियान पूर्वतयारी बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आ. रवि राणा, आ. वीरेंद्र जगताप, आ. बच्चू कडू, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अमरावती : जनसामान्यांच्या अडचणी सोडविणे व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरीय महाराजस्व अभियान १३ जानेवारीला सायन्सकोर मैदानावर होणार आहे. अभियान पूर्वतयारी बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आ. रवि राणा, आ. वीरेंद्र जगताप, आ. बच्चू कडू, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व योजना, उपक्रम यांची परिपूर्ण माहिती नागरिकांना मिळावी यासाठी आवश्यक ती तयारी ठेवावी. अभियान यशस्वी करण्यासाठी व नागरिकांना मोठ्या संख्येने लाभ होण्याचा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश उपस्थित लोकप्रतिनिधींंनी विभागप्रमुखांना दिले.
विविध दाखले, प्रमाणपत्रांचे वाटप
महाराजस्व अभियानातून नागरिकांना विविध योजनांची माहिती, आवश्यक दाखले, महानगरपालिकेशी संबंधित विविध कामे, दाखले, आयुष्यमान भारत योजना प्रमाणपत्रे, जमिनीचे दस्तावेज यांसह विविध कागदपत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. अभियानाला महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. रवि राणा यांनी दिली.